ममता बॅनर्जी म्हणजे राक्षसांची वंशज... भाजपाच्या महाराजांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019
  • ममता बॅनर्जी या राक्षस हिरण्यकश्‍यपूच्या वंशज
  •  भाजपचे नेते साक्षी महाराज यांनी केला आरोप 
  • नव्या वादाला सुरुवात
     

हरिद्वार - ‘‘पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या राक्षस हिरण्यकश्‍यपूच्या वंशज आहेत,’’ अशी टीका भाजपचे नेते साक्षी महाराज यांनी आज केल्याने नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

‘‘जय श्रीरामच्या घोषणा दिल्याबद्दल ममता बॅनर्जी तुरुंगात पाठवायची भाषा करतात. अशा प्रकारचे कृत्य तर राक्षस हिरण्यकश्‍यपू करायचा,’’ असे साक्षी महाराजांनी म्हटले आहे. ‘‘पश्‍चिम बंगालचे नाव ऐकताच मला त्रेतायुगाची आठवण होते.

भगवान विष्णूचे नामस्मरण केल्याबद्दल राक्षसराज हिरण्यकश्‍यपूने  आपल्या मुलाला तुरुंगात टाकले, बंगालमध्ये ममता बॅनर्जीही असेच करत आहेत. ‘जय श्रीराम’ म्हणण्यावरून त्या लोकांना तुरुंगात टाकत आहेत. ममता या हिरण्यकश्‍यपूच्या वंशज तर नाहीत ना?’’ असे साक्षी महाराज यांनी म्हटले आहे. साक्षी महाराज यांना भाजपने उन्नाव लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी दिली होती. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News