महापूर

योगराज पांचाळ दहिफळकर
Tuesday, 13 August 2019

प्रसिद्ध देवस्थान पंढरपुर,
नाशिक ,सांगली,कोल्हापुर.
येथे आला महापुर

कुठे पडतो कुठे नाही
हा मुसळधार पाऊस
पड-पड म्हणलं तरी
पाऊस पडत नाही 

प्रसिद्ध देवस्थान पंढरपुर,
नाशिक ,सांगली,कोल्हापुर.
येथे आला महापुर

माणुस माणसाला पुरात
बुडताना बघत होता
वाटत होतं गाभा-यातील
देवी देवता धाऊन येतील

बुडणा-या माणसाला
दैवी शक्तीने वाचवतील
माणुस हात जोडुन
देवाचा धावा करत होता

नाही आली दया त्याला
कुराण,बायबल,भगवत गीता
पक्षाचे झेंडे सारुन बाजुला
माणुसच माणसासाठी
महापुरात धावला...

महापुराने माणसाला 
माणुसकी शिकवली
राजकारण,धर्मापेक्षा 
माणुस आपला वाटला

पाण्यात बुडुन मेलेल्या
माणसांसाठी कंट हो दाटला
राजकारणी,धर्मवादी
जातीयवादी मानसिकता

माणुसकीच्या दर्शनाने
बुरका टर्रा टर्रा फाटला...
हे महापुरा...तु असाच येत जा
मात्र जिवीत हानी नको करु

महापुरात मनुष्य प्राणी आडकला
तर ही माणुसकी पुढे येईल
मदतीचा हात हातात देत
एकमेका अलिंगन घेईल...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News