महालक्ष्मी breaking: अफवांवर विश्वास ठेवू नका, लवकरच तुमचे नातेवाईक तुमच्याजवळ असतील

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 27 July 2019

शुक्रवार, दिनांक 26 जुलै रोजी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलहून निघालेली महालक्ष्मी एक्सप्रेस बदलापूर आणि वांगणीदरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने थांबली आहे. या घटनेला 15 तासांचा कालावधी उलटला आहे. तरी NDRF चे जवान तसेच स्थानिक पोलिस यंत्रणा प्रवाशांना ट्रेनमधून वाचवण्यासाठी निघाली आहे.

NDRF च्या आठ बोटी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत, तर नौदलाचं एक हेलिकॉप्टरदेखील वांगणी या ठिकाणी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दाखल झाले आहे.

रेल्वे कर्मचारी, आरपीएफ आणि स्थानिक पोलीस यांनी प्रवाशांना ट्रेनमधून खाली न उतरवण्याची विनंती केली आहे. ट्रेनमध्ये तुम्ही सर्व प्रवाशी सुरक्षित आहात आणि रेल्वे प्रशासन सदैव्य तुमच्या मदतीसाठी सक्षम असल्याचे आवाहनदेखील रेल्वे प्रशासनाकडून केले जात आहे.

कल्याणहून कर्जत, खोपोलीकडे जाणारे मार्ग सोडले की मध्य रेल्वेचे सर्व मार्ग प्रवासासाठी खूले आहेत, संध्याकाळी 4 पर्यंत ट्रेनमध्ये पाणी येणार नाही आणि आलेच तर पोलीस प्रशासन तुमची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करेल असे आवाहनही पोलीस प्रशासनाकडून ट्रेनमध्ये जाऊन प्रवाशांना केले आहे.

प्रवाशांना ट्रेनमधून बाहेर काढण्याचं काम युध्द पातळीवर...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News