महाजनादेश यात्रा ही 'चालू' मुख्यमंत्र्यांची 'चालू' यात्रा - धनंजय मुंढे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 6 August 2019

शिवस्वराज्य यात्रेच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवला आहे.

शिवस्वराज्य यात्रेच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवला आहे.

शिवनेरीची पवित्र माती कपाळाला लावून आम्ही निश्चय केला असून हे दळभद्री सरकार घालवून जनतेला रयतेचे राज्य द्यायचे आहे, असे त्यांनी जनतेला सांगितले. मुख्यमंत्र्यांची यात्रा महाजनादेश यात्रा नसून महाधनादेश यात्रा आहे.

महाजनादेश यात्रा ही 'चालू' मुख्यमंत्र्यांची 'चालू' यात्रा आहे, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना फटकारले. एकिकडे मीच मुख्यमंत्री राहणार हे सांगण्यासाठी ही यात्रा आहे, तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांची यात्रा मी मुख्यमंत्री होणार हे सांगण्यासाठी आहे, पण शिवस्वराज्य यात्राही मुख्यमंत्रीपदासाठी नाही तर जनतेच्या हितासाठी आहे. त्यामुळे या तिन्हीं यात्रेचा फरक जनतेने समजून घ्यावा, असे आवर्जून सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News