खंडणीसाठी म्हशींचं अपहरण; अपहरणकर्त्यांकडून म्हशींच्या सुटकेसाठी लाखो रुपयांची मागणी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 30 July 2019

उज्जैन: पैशांसाठी श्रीमंत व्यक्तीला, महिलांना किंवा मुलांचे अपहरण केल्याचे आपण ऐकलं असेल पण एक वेगळंच अपहरण झाले आहे. हे वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही. मध्य प्रदेशातील शाजापूरमध्ये म्हशींचं अपहरण केल्याची अजब-गजब घटना घडली आहे.

उज्जैन: पैशांसाठी श्रीमंत व्यक्तीला, महिलांना किंवा मुलांचे अपहरण केल्याचे आपण ऐकलं असेल पण एक वेगळंच अपहरण झाले आहे. हे वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही. मध्य प्रदेशातील शाजापूरमध्ये म्हशींचं अपहरण केल्याची अजब-गजब घटना घडली आहे. त्यासोबतच अपहरणकर्त्यांनी म्हशींची सहीसलामत सुटका करण्यासाठी लाखो रुपयांची खंडणी मागितली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, २८ जून २०१९ रोजी अंगुरबालाच्या डेअरी फार्ममधील चार म्हशींचं अपहरण करण्यात आलं आहे. डेअरी फार्मचा मालक अंगुरबाला हाडाला अपहरणकर्त्यांनी फोन करून म्हशींचं अपहरण केल्याचं सांगितलं. यावेळी तुला मोठी किंमत मोजावी लागेल, असं अपहरणकर्त्यांनी त्याला धमकावलं. एका म्हशीची किंमत दीड ते दोन लाख रुपयांच्या आसपास आहे. अंगुरबालाकडे मुर्रा जातीच्या अनेक म्हशी आहेत. मागील वर्षी जून महिन्यातही म्हशींचं अपहरण करण्यात आलं होतं. तेव्हा अंगुरबालानं पोलिसांत तक्रारही केली होती. 

'याआधीही जनावरांची चोरी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांकडील जनावरे चोरीला जातात. पण कोणी पोलिसांत तक्रार करत नाहीत. खंडणीची रक्कम देऊन मोकळे होतात. या प्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केला असून, अपहरणकर्त्यांचा शोध सुरू आहे,' अशी माहिती पोलिसांनी दिली. अपहरणकर्त्यांना खंडणीची रक्कम देण्याचा सल्ला काही जणांनी अंगुरबालाला दिला. मात्र, त्याने पोलिसांत तक्रार केली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News