मन करी पक्षी बनावे

नेहांकी अरविंद
Tuesday, 13 August 2019

मन करी पक्षी बनावे, 
सगळ्या बंधनातुन मुक्त व्हावे.
पंख पसरुनी आकाशी झेप घ्यावे, 
मोकळ्या हवेत मोकळा श्वास घ्यावे.
    
नाही कोणाचे टोकणे, 
ना कोणाचे बोलणे, 
ना ते भावुक मनाचे लचके काढणे.
विचार विरहीत होऊन स्व्च्छंद उडणे, 

आनंदी हवेशी झुंज माझी, 
वाटेल का हो थंडी?
ढगांशीही मग हितगुज करावे. 
मन करी की मी पक्षी बनावे.

ना मोबाइलवर डोळे लावून बसणे,
ना च्या सागरात अडकून राहणे.
फेसबुकच्या जंजाळात ना गुंतणे, 
च्या पक्ष्यापेक्षा मनाने पक्षी बनणे.

मन करी पक्षी बनावे, 
सगळ्या बंधनातुन मुक्त व्हावे.
पंख पसरुनी आकाशी झेप घ्यावे, 
मोकळ्या हवेत मोकळा श्वास घ्यावे.
    
नाही कोणाचे टोकणे, 
ना कोणाचे बोलणे, 
ना ते भावुक मनाचे लचके काढणे.
विचार विरहीत होऊन स्व्च्छंद उडणे, 

आनंदी हवेशी झुंज माझी, 
वाटेल का हो थंडी?
ढगांशीही मग हितगुज करावे. 
मन करी की मी पक्षी बनावे.

ना मोबाइलवर डोळे लावून बसणे,
ना च्या सागरात अडकून राहणे.
फेसबुकच्या जंजाळात ना गुंतणे, 
च्या पक्ष्यापेक्षा मनाने पक्षी बनणे.

ना धास्ती, ना कोणाची फिकीर,
ना पंखामध्ये असेल नशीबाची लकीर.
हाताच्या रेषा दाखऊ का मी ज्योतिषी?
एकनिष्ठ राहिन मी आपल्या मताशी.

ना ग्रह, ना तारे... 
ना वाहतील कुंडलीचे वारे.
ना साडेसाती , ना राशी...
चुक झाल्यास ना देइल कोणी फाशी.

ना नोकरी असेल दहा ते पाच,
ना करावा लागेल सरांच्या तालावर नाच.
घोड्यांची शर्यत करावी का मी?
मीच माझी आणि माझी मीच...

ना घालेन बोटात अंगठी,
ना फेरवे पायात
अरे पक्षी ना मी...
का भरावे कुंकू माथ्यात?

ना कुठली चिंता, 
ना कुठलं टेशन.
म्हातारा पक्षी जरी
मी तरी ना कुठली पेंशन...

तरी आयुष्याच्या
सागरात चिंब भिजावे.
मन करी मी पक्षी बनावे.
पण मला माहीतीय..

माझेही पंख ओरबाडले जातील...
खेचुन खेचुन ओरबाडले जातील.
माणसांची जात ना ती,
मला थोडीच सोडतील.
    
मन करी सगळ्यांपासुन दूर पळावे...
खरचं, आयुष्यात एकदा तरी 
मी पक्षी बनावे...
एकदा तरी मी पक्षी बनावे...
        

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News