"आवडणं" आणि "प्रेमात पडणं" यातला फरक माहित आहे का?

अरुण खांडेकर
Friday, 9 August 2019

कोण? कुणाला? कधी? आणि कसा? आवडेल सांगता येत नाही... आवडायला तशी हजार कारणं... कधीकधी तर न भेटता न पाहताही कुणीतरी आवडून जातं...

बऱ्याचदा आवडणं एकतर्फी असतं...पण जेंव्हा ते दोन्हीबाजुनी असतं तेंव्हा कदाचित प्रेमात पडणं शक्य होतं... आवडणं तशी प्रेमातली पहिली पायरी... कोण? कुणाला? कधी? आणि कसा? आवडेल सांगता येत नाही... आवडायला तशी हजार कारणं... कधीकधी तर न भेटता न पाहताही कुणीतरी आवडून जातं... एवढंच काय अगदी प्रेमात पडलेल्या किंवा लग्न झालेल्या जोडीदारालाही कुणीतरी खूप आवडून जातं...

जोडीदाराशिवाय असं कुणी आवडू शकतं? पण ह्रदयावर हात ठेवून डोळे मिटून शांतपणे आठवलं की आवडीचा चेहरा चटकन डोळ्यासमोर येतो... आणि आपसूकच चेहऱ्यावर हसू उमटतं... नात्यात वाद आणि गैरसमज नको म्हणून आपण कधी जोडीदारासमोर तसं बोलत नाही एवढंच... फार कमी लोक आपल्या जोडीदाराला मला तो किंवा ती खूप आवडते असं सांगण्याचं धाडस करतात... कारण समोरचा जोडीदार समंजस असतोच असं नाही... पण खरं सांगायचं तर बोलून नाही दाखवलं म्हणजे आवडणं संपतं असं नाही...

असं कधीतरी कुणीतरी आवडणं आपल्या सगळ्यांचंच सारखं असतं... त्यात गैर काहीच नसतं..."आवडणं" ही मनातील स्वच्छ,निरागस भावना... ती व्यक्त करायला खरंतर काहीच अडचण नसते... पण बऱ्याचदा समोरच्याला काय वाटेल या भीतीपोटी आपण व्यक्तच होत नाही...आपण कुणाला तरी आवडतोय ही भावनाच मनाला प्रचंड सुखावणारी....पण प्रत्येक गोष्ट नैतिक अनैतिकतेच्या चौकटीत बघणारे आम्ही ती सहज स्विकारत नाही... समजून घेत नाही...

खरंतर "आवडणं" निखळ असेल तर ते व्यक्त करायला आणि सहज स्विकारायला काहीच हरकत नसावी..!!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News