मुक्या प्राण्यांना एक घास प्रेमाचा; सेलूतील निसर्गप्रेमी मित्र परिवाराने दिले पंक्तीचे भोजन

सकाळ वृत्तसेवा, (यीनबझ)
Wednesday, 31 July 2019

निसर्गप्रेमी मित्र परिवाराने श्रीक्षेत्र चौकी येथे मुक्या प्राण्यांकरीता स्वयपांक करीत पंक्तीच्या माध्यमातुन त्यांना जेवण दिले. येथील वन परिसरातील भटक्या वन्यजीवांनी या मेजवानीचा चांगला आस्वाद घेतला.

सेलू : ''प्राणीमित्रावर दया दाखवा आणि निसर्गाचा बिघडता समतोल सावरा'' हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सेलूतील फिरता फिरता ग्रुपच्या निसर्गप्रेमी मित्र परिवाराने वानरांना एक घास प्रेमाचा हा उपक्रम राबवीत एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. 

या निसर्गप्रेमी मित्र परिवाराने श्रीक्षेत्र चौकी येथे मुक्या प्राण्यां

रीता स्वयपांक करीत पंक्तीच्या माध्यमातुन त्यांना जेवण दिले. येथील वन परिसरातील भटक्या वन्यजीवांनी या मेजवानीचा चांगला आस्वाद घेतला. सेलूतील या निसर्गप्रेमी मित्र परिवाराने प्राणी मात्राविषयी असलेली आपुलकी पाहता त्यांच्यासाठी ४५ डझन केळी, तीन पायली फुटाणे, स्वतः पोळ्याचा स्वयपांक करीत तेथील या मुक्या प्राण्यांना एक मेजवानी दिली. त्यानी राबविलेल्या  ''एक घास प्रेमाचा'' या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक उपस्थित वानरांनी या पंक्तीच्या माध्यमातून जेवण घेत याचा आस्वाद घेतला. त्यांनी प्राणीमात्रावर दाखविलेली दया व त्यांचे या अभिनव उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले.

या निसर्गप्रेमी मित्र परिवाराचे ३२ सदस्यांनी स्वतः चे घरची कणीक व रक्कम जमा करून हा उपक्रम राबविला. यासाठी या ग्रुपचे मंगेश भुते, अमर सावरकर, प्रशांत डुकरे, आकाश पोहाणे, अमोल बुधबावरे, राजू तुरकर, नितीन लाडे, ललित पोहाणे, राकेश कोल्हे,  दत्ता वाघमारे, प्रवीण कावळे, मयूर हटवार, दिनेश हेडाऊ, सूरज राऊत, प्रवीण भगत, निखिल सावरकर आदींनी यात सहभागी होत मदतीचा हात दिला.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News