४ थी च्या मुलाने त्याच्या वर्गमैत्रिणीला प्रपोज केला आणि...

शंभूराज पाटील
Tuesday, 11 June 2019

मुलींनी मुलगा रंग, वागणे, बोलणे, एवढच पाहून पसंद करणे किती योग्य आहे. याव्यतिरिक्त पण त्याचे विचार मग ते देशाबद्दल, आई वडील दोघांचेही, मित्र आणि भविष्य याबद्दल कसे आहेत ते महत्त्वाचे पाहिले पाहिजे. नेल पेंट निवडताना शंभर वेळा विचार करणाऱ्या मुलींना आयुष्याचा जोडीदार निवडतात जास्तीत जास्त फसवणूकच का वाट्याला येते याचा विचार केला पाहिजे.

आज ज्या विषयावर मला बोलायचे आहे ते एवढ्या कमी शब्दात नक्कीच मांडता येणार नाही, फुल ना फुलाची पाकळी म्हणून थोड का होईना यावर आता बोलायला पाहिजेच. कारण आधीच खूप उशीर झाला आहे, आणि आता जर यावर विचार केला नाही तर पुढचा काळात प्रेम हा फक्त शब्दचं राहिलं. त्यातील भावना केव्हाच मरून जातील.

४ थी च्या मुलाने त्याच्या वर्गमैत्रिणीला प्रपोज केला, ज्याला नीट साधा श्लोक बोलताही येत नसेल. ८ वीच्या मुलींना नीट वाचा पुन्हा एकदा मुलीने म्हणतोय मी त्याचं वर्गातील मुलाला प्रेमपत्र लिहिले. त्याच्या मते प्रेम पत्र म्हणजे फक्त २/३ बदाम. त्यात त्यांची नावे आणि I love you जे पेनाने जास्त गिरवून ठळक केलेलं असते. त्या पत्रात ना कसला भाव होता ना कसलं प्रेम होत ती फक्त नाव आणि नक्षी यांचा आणि कुठेतरी ऐकलेल्या शायरी. १२ वीच्या मुलाला साधा मतदानाचा अधिकार नाही ज्या देशात त्या देशात प्रेम करून संसार करण्याचा अधिकार त्यांचे पालक कसे काय देतात? हेच समजेना; प्रेमाच्या नावाखाली मुलगा व मुलगी यांच्यामधील एक निखळ मैत्रीचे नातं होतं ते आता "लडका और लडकी कभी दोस्त नही होते" हा कोणत्या तरी सिनेमातील डायलॉग मुळे मैत्रीच्या नात्याला केव्हाच बुडवले आहे.

त्यात अतिरेक म्हणजे आजकाल एखादी मुलगी जरा मोकळेपणाने बोलली की काही मुलांना प्रेमाचा गोड गैरसमज होतो. त्यामुळे मागचा पुढचा विचार न करता सरळ मुलींना विचारायचे व नकार मिळाला की आहे ती मैत्री सुद्धा धोक्यात आणून स्वतःला त्रास करून घ्यायचा. तसेच काही मुलीसुद्धा मुलांना सरळ सरळ काही न सांगता विनाकारण कोड्यात पडायचे. ज्या मुलाने १०-१२ वीच्या परीक्षेला जेवढं डोकं चालवले नसेल तेवढं मुलींच्या मनात नक्की काय आहे हे पाहायला चालवले असेल.

माझा प्रेमाला विरोध मुळीच नाही पण ते ज्या मार्गाने होत आहे किंवा ज्या पद्धतीने आजकाल होत आहे ते जरा विचित्र वाटत आहे. काही ठराविक लोकांच्या या वासनेच्या व राक्षसी प्रेमामुळे चांगल्या प्रेमाची पण बदनामी होत आहे. पालकांनी योग्य वेळी आपल्या मुलांच्या मनातील हा नाजुक कोपरा समजावून घेतला पाहिजे. मुलांना आपला प्रेमाच्या जोडीदार निवडताना नक्की काय पाहिले पाहिजे हे  बिनधास्त समजावून सांगितले पाहिजे. माझ्या वडिलांना मी लव्ह मॅरेज बद्दल विचारले असता ते बोलले की "प्रेमाला माझा विरोध नाही, पण प्रेम तेव्हाच कर जेव्हा आम्ही उद्या तुमच्या प्रेमाचा स्वीकार नाही केला तरी तू तिला तिच्या घरच्या प्रमाणे सांभाळू शकतो व एका मुलीची जबाबदारी घेण्याच्या लायक होशील" तेव्हा समजले की प्रेम तेव्हाच केलं पाहिजे जेव्हा आपण ते करण्याच्या लायक होतो.

मुलींनी मुलगा रंग, वागणे, बोलणे, एवढच पाहून पसंद करणे किती योग्य आहे. याव्यतिरिक्त पण त्याचे विचार मग ते देशाबद्दल, आई वडील दोघांचेही, मित्र आणि भविष्य याबद्दल कसे आहेत ते महत्त्वाचे पाहिले पाहिजे. नेल पेंट निवडताना शंभर वेळा विचार करणाऱ्या मुलींना आयुष्याचा जोडीदार निवडतात जास्तीत जास्त फसवणूकच का वाट्याला येते याचा विचार केला पाहिजे व याला फक्त समोरचा मुलगा जेवढं जबाबदार आहे तेवढंच तुम्ही सुद्धा आहात. हेही मान्य केलं पाहिजे.

खूप जण बोलतात प्रेमाला वय, रंग, पैसा आणि इतर गोष्टी लागत नाहीत, खऱ्या आयुष्यात ही वाक्यं फक्त कागदावरच चांगली दिसतात. जिवंत जगात प्रेमाचे नियम खूप वेगळे आहेत यापेक्षा प्रेम करायला या गोष्टी ही वाक्य ठीक आहेत पण ते टिकवायला वेळ, पैसा, काम आणि इतर गोष्टी ज्या निरर्थक वाटतात त्याच खूप मोठी भूमिका प्रेम टिकवायला पार पाडत असतात.
      
हा लेख काहींना आवडला असले तर काहींना नसेल पण वाचून सोडून देण्यापेक्षा विचार तरी करून पाहा निदान की खरेच आपण प्रेम करायला व जबाबदारी घ्याला लायक आहोत का? 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News