प्रेम

श्वेता बरकडे
Saturday, 13 July 2019

कळत नकळत का होईना
पण मी तुझ्या प्रेमात पडले आहे....

कळत नकळत का होईना
पण मी तुझ्या प्रेमात पडले आहे....

तुझ ते निरागस मन
माझ्या मनाला भावल आहे...

तू नसलास समोर की मन माझे बैचेन होते
मला वाटतं हे ही एक प्रेमाचच लक्षण आहे...

लोक बोलतात प्रेम म्हणजे एक आकर्षण आहे
पण  माझ तर तुझ्यावर खूप प्रेम आहे....

आकर्षण म्हणजे फक्त स्वार्थ आहे
प्रेम म्हणजे एक समर्पण आहे....

आपल्या व्यक्तीसाठी केलेला
स्वतःच्या अस्तित्वाचा त्याग आहे...

सांगाव वाटत रे मला खूप 
माझ तुझ्यावर किती प्रेम आहे...

पण येताच प्रेमाचे शब्द ओठांवर
मैत्री तुटण्याची जास्त भीती आहे...

माझ्यासाठी आपलं नात हे
मैत्रीच्या पलीकडचं आहे...

पण सांगेन तुला एकदिवस
माझ्या मनात नेमक काय आहे...

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News