पाहा! हा चिमुकला कसा चालवतो बैलगाडी 

अमित गवळे 
Tuesday, 4 June 2019
  • अडुळसे गावाजवळ पाण्याचा पिंप नेणारी एक बैलगाडी दिसली
  • सराईतपणे व अनुभवी व्यक्तीप्रमाणे हा मुलगा बैलगाडी हाकत होता.
  • पालीतील वेदांत विजय यादव हा अवघ्या पाच वर्षाचा लहानगा सराईतपणे बैलगाडी चालवितो.

रायगड: विज्ञान व तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांना सुखाचे दिवस दाखविले आहेत. दळणवळणाच्या साधनांमध्ये देखील अमुलाग्र बदल झाला आहे. मात्र अजुनही काही गाव खेड्यातील लोक शेतीसाठी व विवीध कामांसाठी बैलगाडीचा वापर करतांना दिसतात. पालीतील वेदांत विजय यादव हा अवघ्या पाच वर्षाचा लहानगा सराईतपणे बैलगाडी चालवितो. त्याला पाहून असे वाटते की, गावखेड्यातील ही बैलगाडी चालविण्याची परंपरा व कौशल्य भावी पिढी पुढे चालविणार आहे. 

पाली नांदगाव मार्गावर मंगळवारी (ता.४) सकाळी अडुळसे गावाजवळ पाण्याचा पिंप नेणारी एक बैलगाडी दिसली. आश्चर्य चकीत करुन टाकणारी बाब म्हणजे बैलागाडी एक लहानगा चालवत होता. अगदी सराईतपणे व अनुभवी व्यक्तीप्रमाणे हा मुलगा बैलगाडी हाकत होता. चालता चालताच त्याच्याशी संवाद साधला. 

"माझ नाव वेदांत विजय यादव आहे" असे आत्मविश्वासाने सांगितले. बैलगाडी चालवितांना भिती वाटते का?  "नाही" म्हणाला उलट "खुप मज्जा येते" असे त्याने सांगितले. पाठीमागून वेदांतचा मामा येत होता. त्याने सांगितले की, वेदांत यावर्षी पहिलीला जाणार आहे. बैलांचा कासरा कसा ओढावा, बैलगाडी कशी पुढे न्यावी, थांबवावी, वळवावी, बैलांना सांकेतिक आवाज कसा द्यावा हे सर्व वेदांत उत्तम प्रकारे जानतो. त्याला अशा प्रकारे बैलगाडी चालवितांना पाहुन खुप अप्रुप वाटते. आजुबाजुने जाणारी अनेक माणसे त्याला बैलगाडी चालवितांना बघून आश्चर्य व्यक्त करत होती. वेदांतला पाहून तो बैलगाडी चालविण्याचे कौशल्य व परंपरा नक्की पुढे चालवेल असे वाटते. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News