रणवीरचा वृद्ध फॅनसोबत डान्स

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 6 August 2019
  • एका वृद्ध फॅनसोबत डान्स करताना रणवीर सिंह
  • ‘८३’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनला रवाना
  • रणवीर सिंह बॉलीवूडमधील सर्वात एनर्जेटिक अभिनेता

अभिनेता रणवीर सिंह बॉलीवूडमध्ये सर्वात एनर्जेटिक अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याच्या चित्रपटांचे देशातभरात बरेच फॅन्स पाहायला मिळतात. कधीतरी चक्‍क तो त्याच्या फॅन्सला कॅज्युअली भेटतानादेखील दिसतो.

नुकताच तो त्याच्या ‘८३’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनला रवाना झाला होता. या वेळी लंडनमधील साऊथ हॉल येथे त्याच्या फॅन्सने त्याला घेरले आणि ढोल-ताशांच्या गजरात त्याचे स्वागत केले.

या वेळी रणवीर त्यांच्या एका वृद्ध फॅनसोबत डान्स करताना दिसून आला. सध्या हे व्हिडीओ आणि फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News