‘लोकल व्हाया दादर’चा प्रेमप्रवास

यिनबझ ऑनलाईन टीम
Saturday, 16 February 2019

महाराष्ट्राच्या मातीतला खेळ म्हणजे कुस्ती. या मैदानी खेळावर आधारितच ‘तालिम’ चित्रपट मराठीत प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली ती दिग्दर्शक नितीन रोकडे यांनी. आता नितीन आणखी एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असून ‘लोकल व्हाया दादर’ असं त्याचं नाव असल्याची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.

सोशल मीडियावरून या चित्रपटाचे टीझर पोस्टरही प्रदर्शित केलं आहे. विशेष म्हणजे अभिनेता वरुण धवनने या चित्रपटाचे पोस्टर त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करत नव्या मराठी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘लोकल व्हाया दादर’मध्ये एक आगळी-वेगळी प्रेमकथा सिनेरसिकांना अनुभवायला मिळणार आहे.

करूणावी क्रिएटर निर्मित या चित्रपटात नेमके कोणते मराठी कलाकार झळकणार यावर अद्यापही प्रश्‍नचिन्ह आहे. लोकलमध्ये घडलेल्या भेटीगाठी आणि त्यामधूनच फुलत जाणारं प्रेम या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याचीही सध्या शक्‍यता वर्तवली जाते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News