करोडो रूपयांच्या संपतीवर प्रेमी युगलांने सोडले पाणी

सतिश निकुंभ
Thursday, 18 July 2019
  • हक्क सोडपत्र लिहून कौटुंबिक बंधनातून मिळवली मुक्तता 

सातपूर : प्रेम कथेवर आधारीत लैला-मजनु, हिर-रांझा, सोहनी महिवाल, एक दुजे के लिए....यासारख्या चित्रपटांतून आयुष्यभर एकमेकांची साथ देणारे, जीवाला जीव देणारे आणि रूढी, प्रथा, चालीरिती विरोधात संघर्ष करून पुन्हा एकत्र आलेले प्रेमीयुगूल आपण नेहमीच बघतो. नाशिकच्या पिंपळगाव बहुला भागात एकमेकांच्या घरासमोर राहणाऱ्या युगूलाचे महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान सूत जुळले, जवळीक वाढली आणि घरच्यांच्या विरोध डावलून पळून जाऊन लग्नही केले. पण ही गोष्ट एवढ्यावरच थांबली नाही.

दोघांच्या नावावर असलेल्या करोडो रूपयांचा प्रश्‍न उभा ठाकला तेव्हा या युगूलाने "प्रेमासाठी वाटेल ते..' असे दाखवत हक्क सोडपत्र लिहून देत करोडे रूपयांच्या संपत्तीवर पाणी सोडले आणि नव्या वळणावरील संसार थाटण्यासाठी हे दोघे दोन्ही कुटूबांच्या साक्षीने हातात हात घालत बाहेर पडले. 

नाशिक परिसरातील पोलिस ठाण्यात सद्या कौटुंबिक विरोध डावलून पळून जाऊन विवाह करण्याच्या अनेक घडना आपण वाचतो, ऐकतो आणि टिव्हीवर बघत असतो. पण नाशिकच्या पिपंळगाव बहुला परिसरातील ही घटना वेगळी ठरली आहे.

या गावातील प्रतिष्ठीत व आर्थिक सदन असलेल्या कुटूंबातील मुलगा-मुली हे दोन्ही एकमेकांच्या घरासमोर राहत होते, कॉलेजमध्येही दोघे बरोबरच होते. साहजिकच ओळख, जवळीक वाढली आणि त्यांचे रूपांतर प्रेमात झाले. पुढे या युगलाने कुटूंबाचा विरोध डावलत लग्नही ऊरकून घेतले. 

थेट पोलिस ठाण्यात, संरक्षणाची मागणी 
सज्ञान असलेल्या या युगूलाने लग्नानंतर थेट सातपूर पोलिस ठाणे गाठले आणि आम्हाला आमच्या कुटूंबापासून जीवाला धोका असल्याने संरक्षण मिळावे अशी मागणी पोलिसांकडे केली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित दोन्ही कुटूंबाना पोलिस ठाण्यात बोलावून घेत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण दोन्ही कुटुंब ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. याला कारणही तसेच होते.

संपत्तीपेक्षा प्रेम ठरले वरचढ 
या प्रेमी युगुलच्या नावावर करोडो रूपयाची संपती होती. त्यामुळे दोन्ही कुटूंब मानसिक तणावत होते. याबाबत प्रदिर्घ चर्चाझाली, पण तोडगा काही निघत नव्हता अखेर आपल्या नावावर असलेली करोडो रूपयाची संपतीवर हक्क सोड पत्र लिहून देण्याचा तोडगा काढण्यात आला. हा तोडगा या युगूलाने मान्य केला. तसेच दोन्ही कुटूंबही तयार झाले. दुसऱ्याच दिवशी वकीलाने हक्क सोडपत्र तयार करून आणले आणि त्यानंतर या युगूलाने हसत हसत त्या पत्रावर सह्या केल्या आणि संपत्तीपेक्षा "प्रेम' महत्वाचे असे दाखवत दोघांनीही पोलिस ठाण्यातुन एकमेकांचा हात धरून बाहेर पडले.  

टिव्ही व मोबाईल मुळे तरूण पिढीला आपण काय करीत आहोत. याच भान विसरत चालले आहे. त्यामुळे अनेक कुटूंबाला आपल्या भावी पिढीपासूनच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महिला वर्गाने आधिकच सजग राहण्याची गरच आहे 
-विलास जाधव, वरीष्ठ पोलिस निरीक्षक,सातपूर

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News