"वंचितांची व्यथा साहित्यातून मांडणारे साहित्यकार": साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

 प्रा. किशन पवित्रे, मुखेड
Sunday, 28 July 2019

अनेक मातंग समाजाचे प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडवले तरच खरे अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे केले केल्यासारखे होईल.
 प्रा. किशन पवित्रे, मुखेड
मो.7875537208

1. ऑगस्ट रोजी थोर साहित्यिक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती जन्मशताब्दी वर्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे महाराष्ट्रात तर गावपातळीपासून राज्यपातळीवर त्यानिमित्ताने अण्णाभाऊ बद्दल त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्याचबरोबर त्यांनी निर्माण केलेल्या साहित्याबद्दल वेगवेगळ्या पातळीवर विचारमंथन होणार.

अण्णाभाऊ यांनी लिहिलेलं प्रचंड ताकतीच साहित्य वाचल्यानंतर मती कुंठित होते माणूस चक्रावून जातो त्याचं कारण असं की, अण्णाभाऊ च्या जन्मापासून मृत्यूपर्यंत त्यांच्या वाट्याला आलेल्या दारिद्र्य आणि कौटुंबिक परिस्थिती हे सारे विदारक असताना हा माणूस एक तत्व घेऊन जीवन जगतो आपण फक्त अण्णाभाऊ च्या साहित्य विषयी चर्चा करतो मात्र जगण्यातील जी तत्वज्ञान आहे त्यावर चर्चा करत नाही.

संत तुकाराम महाराज म्हणतात"बोले तैसा चाले त्याचे वंदावी पावले"पुस्तक लिहिणारी माणसं आपणास भरपूर र् भेटतील परंतु तत्त्वज्ञानाशी बांधिलकी स्वीकारून जीवन जगणारी माणसं मात्र कोटीत सुद्धा सापडणे कठीण आहे. म्हणून मला अण्णाभाऊ साठे महान वाटतात.

सर्वत्र संपन्नता असूनही संपत्तीच्या हव्यासापोटी कोणापुढेही कमालीची लाचारी करणारी माणसं पाहिली की, अण्णाभाऊंची महानता लक्षात येते माणसं ज्ञानी असणं आणि माणसाप्रमाणे कसं या दोन बाबी भिन्न आहे ज्ञानी माणसं तुम्हाला भरपूर भेटतील परंतु प्रमाणिक माणसं खूप खूप दुर्मिळ सापडतात ज्ञानी माणसापेक्षा प्रामाणिक माणूस समाजाच्या खूप खूप कामी येतात समाजासाठी त्यांची जास्त गरज आहे म्हणूनच च् युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात"मला इमानदार व निष्ठेची माणसं हवी आहे "ज्ञानावर प्रचंड प्रेम करणारे, ज्ञान संपादन करण्यासाठी ज्यांनी अख्खे आयुष्य पणाला लावलं ते युगंधर बाबासाहेब इमानदार माणसाची अपेक्षा करतात बाबासाहेबांच्या नजरेतील इमानदार माणूस म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे.....

अण्णाभाऊ त्यांच्या देशातच स्वतंत्र भारतात असं म्हणतात थांब. दारिद्र हे फार क्रूर असते आणि ते नग्न असते दारिद्र्याच्या खूना माणसाच्या मनावर, हृदयावर चेहऱ्यावर उमटलेल्या दिसतात त्या म्हणजे कपड्यावरील जुनी ठिगळ नी फाटक्या कपड्यांना घातलेले टाके. अण्णाभाऊ साठे यांचा लढा माणुसकीच्या हक्कासाठी होता अण्णाभाऊ, स्वर्ग, नरक, पाप, पुण्य, नवस अंधश्रद्धा अशा प्रकारच्या समाज विघातक गोष्टींना कुठल्याही प्रकारचा आपल्या साहित्यात थारा दिला अण्णाभाऊ साठे पूर्णपणे बुद्धिवादी होते डोळे मिटून बुद्धी गहाण ठेवून काहीही स्वीकारले नाही.

विषमतेची, अंधश्रद्धेचे, श्रमाची तत्वज्ञान त्यांनी नाकारली 1958 मध्ये पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटन अण्णाभाऊ साठे यांच्या हस्ते झाले. त्यातच त्यांचे ते सुप्रसिद्ध भाष्य त्यांनी केले"ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर उभी नसून श्रमिकांच्या तळहातावर आहे"

महाराष्ट्रातील तमाम बहुजन बांधव आज विघटित स्वरूपात असलेले दिसत आहे. उठ सूठ मी म्हणतो तोच फुलेशाहूरविदास, आंबेडकर, शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठे हा परिवर्तनवादी विचार आहे असे समजतात म्हणून सर्व बहुजन समाजात एकोपा निर्माण होण्याऐवजी दुफळी निर्माण झालेली आपणास पाहावयास मिळते आहे. रंगीबेरंगी झेंडे, महापुरुषांच्या फोटो पेक्षाही कार्यकर्त्यांचाच पोस्टरवर मोठा फोटो हे हास्यकल्लोळनिर्माण करणारे वातावरण पाहून येथील सत्तापिपासू श्रीमंतीचे ठेकेदार सदगदित होऊन आनंदाने हे चित्र पाहत असतात. किंबहुना पोस्टर साठी काही पैसाअडका कमी पडला तर ते तथाकथित नेते कार्यकर्त्यांना बोलावून घेऊन पैसा देऊ करतात. कारण त्यांना तर हीच हवे आहे. राज्यातील नव्हे तर देशातील एकूण एक जाती जितक्या प्रमाणात जाती जातीसाठी आंदोलने उभारतील तेच त्यांच्यासाठी फायद्याचे आहे.

मित्रहो  जरा डोळ्यावरची झापड बाजूला करा गेली कित्येक पिढ्या खळं_भिकन, गिर्हन गावकी मागण्याची आपली परंपरा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील तमाम दिग्गज राजकारणी धनदांडग्यांना शह देत देत भारतीय राज्यघटनेद्वारे झुगारून, लाचारीचे हे आपले जीवन नष्ट करून स्वाभिमानी जीवनाचा रथ इथपर्यंत आणून सोडला आहे. त्या रथाची चाके गतिमान करण्यासाठी तर तमाम बहुजनांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार स्वीकारावे म्हणून जगविख्यात साहित्यिक सत्यशोधक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी योग्य दिशा दर्शनाचे कार्य केले आहे. त्यांच्या लेखणीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विचाराच्या सर्वच महापुरुषांची नाळ साधते यांचे महत्त्वाचे कार्य केले आहे.

किंबहुना हाच विचार जगाला तारणहार होऊ शकतो हे विधान अधोरेखित करण्यासाठी भारतीय स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवशीच अण्णाभाऊ म्हणतात"यह आझादी झुठी है देश कि जनता भुकी है!"या अज्ञानी उपाशी, यातनांनी रोज मरणार्‍या जीवासाठी स्वातंत्र्याचे मोल ते काय?

अण्णाभाऊ साठे यांच्या या अजरामर साहित्यात"भूक"या शब्दाचे जवळ निर्माण झालेली स्पंदने हळूहळू विस्तारित होऊन अज्ञान, अंधश्रद्धा, स्वाभिमान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या मानवी मूल्यचा रथ जाणून स्थिरावतात तर कोंबडी चोर या कथेत त्यांचा नायक रामू म्हणतो, स्वातंत्र्य कोणाला प्राप्त झाले आहे? असा प्रश्न उपस्थित पुढाऱ्यांना निर्भीडपणे विचारून स्वतंत्र भारतात राजकीय लोकशाही तर मी निर्माण करू शकलो पण सामाजिक लोकशाही आणखीन निर्माण व्हायची आहे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आशावाद अण्णाभाऊ आपल्या साहित्यातून मांडतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ज्ञानवंतने दुःखी यातनेतून काढले. मुक्या लेकरांना बोलायला लावलं. डॉ. बाबासाहेबांच्या आंदोलनाची आग पिऊन अण्णाभाऊंनी दलित व बहुजन सन्मानासाठी त्यांची लेखणी झिजवली त्यांच्या साहित्यातील नायक नाईका आपल्या हक्कासाठी, सन्मानासाठी निष्ठापूर्वक संघर्ष करताना दिसतात अण्णाभाऊ विशिष्ट जातीचे वा जमातीचे नव्हते तर जगातील कष्टकऱ्यांचे, वंचितांचे शोषितांचे प्रतिनिधित्व प्रमाणिकपणे केले. पीडित जगाचे, संचिताचे दर्शन अतिशय समर्थपणे अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून मांडले.

अण्णाभाऊ साठे हे एक दुर्लक्षित पात्र आहे. जागतिक प्रतिमा असणारा माणूस  प्रतिभावंत साहित्यिक माणसाला भारतीय समाज व्यवस्थेने बंदिस्त केले. या देशातील वर्णवर्चस्ववादी व्यवस्थित मानवी जीवनाची चाकोरी निश्चित असते.

कवी सुरेश भट यांच्या शब्दात"हे दुःख राजवरर्वी ते दुःख मोरपंखी जे जन्मजात दुःखी त्यांच्या उपाय नाही" अशा जन्मजात दुखी मातंग समाजात दुष्काळाशी सामना करता करता त्यांचे आईबाप केवळ जगण्यासाठी वाटेगाव ते मुंबई पायी निघाले  मुंबई काम शोधता-शोधता अण्णा भाऊची लालबावटशी ओळख झाली जगातील कामगारांनो एक व्हा गमावण्यासारखे तुमच्याकडे काहीच नाही या कार्ल मार्क्स च्या विचारांनी आर्दे जग पादक्रांत केले होते. अण्णाभाऊ एका जागतिक विचारसरणी बरोबर जुळले आणि त्यांच्यातील तेच प्रकटपणे त्यांनी जीवन संघर्ष करणारी हजारो पात्रे निर्माण केली.

अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष हे संपूर्ण महाराष्ट्रभर शासन स्तरावर साजरा होणारा आहे ही एक समाजासाठी गौरवाची बाब म्हणावी लागेल परंतु जन्मशताब्दी वर्ष साजरा करत असताना मातंग समाज आणि अण्णाभाऊ साठे यांच्या बाबतीमध्ये गेली कित्येक वर्षापासून अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ज्यामध्ये मुंबई विद्यापीठाचा प्रश्न आहे शासनाने जर हे जन्मशताब्दी वर्ष मुंबई विद्यापीठाला अण्णाभाऊ साठे यांचे नाव देऊन साजरे केले तर खरोखरच जन्मशताब्दी वर्ष साजरे केल्या सारखे होणार आहे त्याचबरोबर लहुजी साळवे यांच्या स्मारकाचा प्रश्न आहे चिराग नगर मधील अण्णाभाऊ साठे यांचे घर हे राष्ट्रीय स्मारक झाले पाहिजे अशी गेल्या अनेक वर्षापासून मातंग समाजाची मागणी आहे तीसुद्धा पूर्ण झाली पाहिजे तसेच महाराष्ट्रातील मातंग समाजातील तरुण-तरुणी आज बेकारी मध्ये आहेत त्यांना वर काढण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाला भरपूर निधी देऊन तरुणांच्या हाताला काही कौशल्ये विषयक काम देता येईल का? याकडेही शासनाचे लक्ष निश्चितच असले पाहिजे .

असे अनेक मातंग समाजाचे प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडवले तरच खरे अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे केले केल्यासारखे होईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News