शाळकरी मुलांचा एसटीच्या छतावरून जीवघेणा प्रवास 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 22 July 2019
  • अकोला येथील शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे पाहायला मिळत आहे.
  • दररोज शाळेत जाण्यासाठी हे विद्यार्थी चक्क एसटीच्या छतावरून प्रवास करत आहेत.

अकोला :  अकोल्यात एसटीच्या छतावरून शाळकरी मुलांचा जीवघेणा प्रवास सुरु आहे. या मुलांना शाळेत जाण्यासाठी एसटी हा एकमेव पर्याय उपलब्ध असल्याने त्यांना अशा पद्धतीने प्रवास करून शाळा गाठावी लागत आहे. मात्र हा प्रवास अत्यंत धोकादायक असून यातून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

अकोला येथील शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. दररोज शाळेत जाण्यासाठी हे विद्यार्थी चक्क एसटीच्या छतावरून प्रवास करत आहेत. एसटी बसचा पर्याय विद्यार्थ्यांना जरी असला तरी त्यांना एसटीच्या छतावर बसून शाळा गाठावी लागत आहे. जर एखादी दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण? असा सवाल येथील स्थानिकांनी आणि पालकांनी केला आहे. याबाबत खा. हेमंत पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. खा. पाटील यांनी संबंधित तक्रारीची दखल घेतली असून यावर तातडीने उपाययोजना करण्याचे सांगितले आहे. 

दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अशाप्रकारे जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. कुठे गावात नदीवर पुल नसल्याने विद्यार्थी नदीपात्रातून वाट काढत शाळेत जाताना दिसत आहेत. तर कुठे एकाच रिक्षेतून मर्यादेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना घेऊन जात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. याबाबत गांभीर्याने पाहण्याची गरज असून विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित प्रवास देणं गरजेचं आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News