तगमग झाली जीवाची...

कु. गणेश गायकवाड, नवी मुंबई
Saturday, 17 August 2019

सांगायचे होते तेव्हा तुला
तुलाच नव्हती सवड
आता तर जमणारच नाही
राहिलीच नाही आवड

अडखत अडखत बोललो जरी
शब्दांना हवी होती धार
म्याळ स्वभावाची तू परी 
सांगायला उशीर केलास फार.

बोलू कसे तुला मी
सुचले नाही तेव्हा मला
शब्द मला तो नवखा होता
भावले नाही तेव्हा तुला.

सांगायचे होते तेव्हा तुला
तुलाच नव्हती सवड
आता तर जमणारच नाही
राहिलीच नाही आवड.

उसावलेल्या शब्दांना
ठिगळं आता लावू नको
समोर जरी आलो तुझ्या
धडे मला देऊ नको.

झालं गेलं विसर तू
नवीन वाट धर आता
तिथंही गणित सारखच आहे
ते तू बघ आता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News