परदेशातील विद्यापीठांमधील जीवन जाणून घ्या..

दिलीप ओक, परदेशी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शक
Wednesday, 12 June 2019

प्रत्येक देशाच्या विद्यार्थ्यांची असोसिएशन असते. त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याला पाहता येतात. संगीताचे व नृत्याचे कार्यक्रम असतात.

अमेरिकी विद्यापीठांत शिक्षणाचा दर्जा सांभाळला जातोच, त्याचबरोबर वेगवेगळे शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमही सुरू असतात. त्यात विद्यार्थ्यांना भाग घेण्यास प्रवृत्त केले जाते. सर्वांत मोठा फायदा म्हणजे, विविध देशांतील संस्कृतींचे आणि विविध भाषा बोलणारे विद्यार्थी तिथे भेटतात. त्यामुळे आपला दृष्टिकोन निश्‍चितच व्यापक होतो.

प्रत्येक देशाच्या विद्यार्थ्यांची असोसिएशन असते. त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याला पाहता येतात. संगीताचे व नृत्याचे कार्यक्रम असतात. त्यामुळे जगाची ओळख होते. अमेरिकेतील शिक्षण संपल्यावर नोकरी करताना या सर्वांचा खूप फायदा होतो. कारण तेथे विविध देशातल्या लोकांच्या टीमबरोबरच तुम्हाला काम करावे लागते. विद्यापीठात खेळालाही पुष्कळ महत्त्व असते.

अतिशय सुसज्ज अशी मैदाने व स्टेडियम्स मुलांसाठी उपलब्ध असतात. उत्तम व्यायामशाळा विनामूल्य उपलब्ध असतात. मानसिकप्रमाणेच शारीरिक तंदुरुस्तीही आवश्‍यक आहे, हे तेथील शिक्षणपद्धतीने जाणले आहे. विद्यापीठांची ग्रंथालये मोठी असतात. कित्येकदा ती ५ ते ६ मजली इमारतींमध्ये पसरलेली असतात. विद्यार्थ्यांना एका वेळेस कितीही पुस्तके घेण्यास परवानगी असते. विद्यापीठांत संशोधन (रिसर्च) करणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्‍यक ती सर्व माहिती तेथील ग्रंथपाल तत्परतेने देतात. 

महत्त्वाचे म्हणजे, अमेरिकन संस्कृतीमधील खालील चांगल्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात ः
देशाभिमान ः प्रत्येक अमेरिकन माणसाला त्याच्या देशाचा विलक्षण अभिमान असतो. आपल्या देशाबद्दल कोणीही वाईट बोललेले त्यांना आवडत नाही. हा गुण आपण घेणे आवश्‍यक आहे. 

वेळेचे महत्त्व ः दिलेली वेळ पाळणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. 

सामाजिक जबाबदारीचे भान ः कोठेही कचरा न टाकणे, आजूबाजूच्या लोकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेणे, मोठ्या आवाजात न बोलणे, रांगेत न कुरकुरता उभे राहणे, कायदा पाळणे आदी गोष्टी आपल्या अंगवळणी पडतात. 

समोरच्या माणसांशी ओळख नसली तरी हसून बोलणे. त्यामुळे वातावरण मैत्रीपूर्ण व खेळकर राहते. इतरांच्या खासगी आयुष्याची चौकशी न करणे. इतरांच्या जाती-धर्माबद्दल, कपड्यांबद्दल टिप्पणी न करणे. या सर्व गोष्टी शिकून विद्यार्थी परत आपल्या देशात आल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News