सत्यशोधक कार्यकर्ते ना. जा. उपाख्य आप्पासाहेब दांडगे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 6 July 2019

बुलडाणा: शिक्षणतज्ज्ञ, जेष्ठ पत्रकार, माजी प्राचार्य ना. जा. उपाख्य आप्पासाहेब दांडगे (वय 82) यांचे मंगळवारी (ता. 2) रात्री वृध्दपकाळाने निधन झाले. बुधवारी संगम तलाव स्मशानरभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात प्रकाश, विकास ही दोन मुले, सौ. सिमा गायकी ही मुलगी व पत्नी असा परिवार आहे.

यशवंत अध्यापक महाविद्यालयात आप्पासाहेब दांडगे दीर्घकाळ प्राचार्य होतो. अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांचे सहकारी व कार्यकर्ते, बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष, अमरावती विभागील अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष अशा अनेक महत्वपूर्ण पदावर त्यांनी कार्य केले होते. 

महात्मा जोतिराव फुले यांचे जीवन चरित्र, शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक सदस्य पंढरीनाथ पाटील यांचा चरीत्रग्रंथ ना. जा. दांडगे यांनी लिहला आहे. हा चरीत्रग्रंथ सत्यशोधक चळवळीच्या प्रणेत्यांचा जीवन दस्ताऐवज म्हणून गौरविला गोला. तसेच ना. जा. दांडगे यांनी अनेक वर्षे "बुलडाणा पत्रिका" साप्ताहिक अतिशय तळमळीने चालवले. आप्पासाहेब दांडगे यांना बुलडाणा जिल्हा प्रेस कॉन्सिलने "पत्रतपस्वी" या सर्वोच्च जीवन गौरव पुरस्काराने गौरविले होते. महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते, विचारवंत आणि पत्रकार तसेच विविध शैक्षणिक, सामाजिक चळवळीशी त्यांचा निकटचा संबंध होता. 

मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस व कामगार मंत्री डॉ. संजय कुंटे, जेष्ठ पत्रकार सोमनाथ सावळे यांनी दांडगे यांच्या निधनानंतर तीव्र शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News