अखेर शमी बीसीसआयच्या कृपेने अमेरिकेला रवाना होणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 27 July 2019
  • भारताचा वेगवान गोलंदाज महंमद शमीवर लैंगिक अत्याचार आणि घरगुती हिंसाचाराचे खटले सुरु असल्यामुळे अमेरिकच्या दुतावासाने त्याचा व्हिसा नाकारला होता. मात्र, बीसीसीआयने मध्यस्थी केल्यामुळे त्याला अमेरिकेचा व्हिसा मिळाला आहे.  त्यामुळे आगामी ट्वेंटी20 मालिकेसाठी त्याला अमेरिकेला जाता येणार आहे. 

नवी दिल्ली - भारताचा वेगवान गोलंदाज महंमद शमीवर लैंगिक अत्याचार आणि घरगुती हिंसाचाराचे खटले सुरु असल्यामुळे अमेरिकच्या दुतावासाने त्याचा व्हिसा नाकारला होता. मात्र, बीसीसीआयने मध्यस्थी केल्यामुळे त्याला अमेरिकेचा व्हिसा मिळाला आहे.  त्यामुळे आगामी ट्वेंटी20 मालिकेसाठी त्याला अमेरिकेला जाता येणार आहे. 

शमीने काही दिवसांपूर्वी मुंबईतील अमेरिकेच्या दुतावासात व्हीसासाठी अर्ज केला होता. मात्र, पत्नी हसीन जहॉं हिने त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केल्याने त्याच्यावर खटला दाखल करण्यात आला आहे. त्यामुळेच अमेरिकेच्या दुतावासाने त्याचा व्हिसाचा अर्ज नाकारला होता. मात्र, बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांनी अमेरिकन दुतावासाला पत्र लिहून शमीच्या उत्कृष्ट कामगिरीची माहिती दिली. तसेच त्याला व्हिसा मंजूर करावा अशी मागणीही केली. 

बीसीसीआयच्या विनंतीनंतर अमेरिकेने शमीला व्हिसा मंजूर केला आहे. 29 जुलैला तो अमेरिकेला जाणार आहे. अमेरिकेत भारत तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News