राजकीय फायद्यासाठी क्रांती मोर्चाचा वापर करणाऱ्यांना धडा शिकवू

राजेभाऊ मोगल
Wednesday, 24 July 2019
  • मराठा समाजाची सामाजिक चळवळ आहे, त्यामुळे याचा कुणीही राजकीय फायदा घेण्यासाठी वापर करू नये
  • अन्यथा त्यांना धडा शिकवू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी बुधवारी (ता.२४) दिला

औरंगाबाद: मराठा क्रांती मोर्चा ही मराठा समाजाची सामाजिक चळवळ आहे, त्यामुळे याचा कुणीही राजकीय फायदा घेण्यासाठी वापर करू नये, अन्यथा त्यांना धडा शिकवू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी बुधवारी (ता.२४) दिला आहे. 

क्रांती मोर्चातील काही जणांनी आगामी विधानसभा लढणार, असे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी येथील सिंचन भवन विश्रामगृहात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची बैठक झाली.

त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत समन्वयकांनी सांगितले, की क्रांती मोर्चाचा कुणालाही राजकीय फायदा घेता येणार नाही. जर कुणी या मोर्चाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांना समाज धडा शिकवेल. प्रसंगी त्यांच्याशी दोन हातही करू, असेही यावेळी स्पष्ट केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News