"सोनिया गांधींना भेटण्यापेक्षा विठूमाऊलीचे दर्शन घेऊ".. शिवसेनेचा राज ठाकरे यांना टोला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 10 July 2019

मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल किंवा भाजपचा असेल; तो आता आमचा असेल. युतीत आता ‘मैं’ ऐवजी ‘हम’ला महत्त्व आहे. मुख्यमंत्री कोणीही झाला, तरी तो युतीचा असेल.

- संजय राऊत, शिवसेना नेते

नवी दिल्ली : ‘लोक दिल्लीत येऊन सोनिया गांधींची भेट घेतात; आम्ही पंढरपूरला जाऊन विठुमाउलीचे दर्शन घेऊ,’ असा टोला शिवसेनेने मनसेप्रमुख राज ठाकरे यांना लगावला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पंढरपुरात गेले आणि त्यांनी दर्शन घेतले तर काय बिघडले, असा उपरोधिक सवाल शिवसेनेचे संसदीय नेते संजय राऊत यांनी विचारला. दिल्लीत कोण कोणाला भेटते, याची डायरी घेऊन बसत नाही, असेही ते म्हणाले.

राज ठाकरे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती त्यानंतर या भेटीची राष्ट्रीय माध्यमांमध्ये चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे व पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भेटीच्या आठवणीही जागवल्या. ‘इंदिरा गांधींची कोणाची तुलना होऊ शकत नाही. त्यांनी देश घडवला; पाकिस्तानचे तुकडे केले. शिवसेना बरखास्तीचा डाव इंदिराजींनी हाणून पाडला,’ अशा शब्दांत राऊत यांनी यूपीए नेतृत्वालाही चिमटा काढला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News