आधी सेट होऊ दे, मग बघू... "आठवतं का हे वाक्य"

शंभूराज पाटील, तांबवे 
Sunday, 30 June 2019

आजच्या धावत्या जगात आपण 'आधी सेट होऊ दे, मग बघू...' या एवढ्या छोट्याशा वाक्यामुळे आयुष्य हे फक्त व्यवहारीक दृष्ट्या नाही तर आनंदातसुद्धा जगायचे असते हे विसरूनच गेलोय. मला अजूनही समजले नाही की माणूस नक्की केव्हा स्थिर होतो.

आजच्या धावत्या जगात आपण 'आधी सेट होऊ दे, मग बघू...' या एवढ्या छोट्याशा वाक्यामुळे आयुष्य हे फक्त व्यवहारीक दृष्ट्या नाही तर आनंदातसुद्धा जगायचे असते हे विसरूनच गेलोय. मला अजूनही समजले नाही की माणूस नक्की केव्हा स्थिर होतो.

सहसा पदवी शिक्षण पूर्ण झाले की हा तगादा चालू होतो."आता नोकरी बघ आणि सेट हो."बेरोजगारीच्या जगात जर नोकरी पाहिली तर पर्मनंट नोकरी बघ आणि सेट हो.. त्यातसुद्धा चांगल्या पगाराची नोकरी पहिली की मग आता लग्न कर आणि सेट हो. लग्न झाले की आता मुलबाळ होऊदे मग सेट हो. मुलबाळं झाली की त्यांचं शिक्षण झाले की तू सेट झालास आणि मुलबाळ नोकरी करून लग्न झाले की मग तू आता सेट झालास आणि खऱ्या अर्थाने जगायला मोकळा झाला.

म्हणजे ज्याने संपूर्ण आयुष्य सेट होण्यात घालवले, तो माणूस म्हातारपणी सुखाने जगायला कसा काय मोकळा होवू शकतो? या सेट होण्याच्या नादात आताची पिढी मोठमोठे निर्णय धाडसाने घेण्यासाठी घाबरतात.लग्न करायच्या वयात सेट नाही म्हणून पार तिशीचा आकडा गाठतो, लग्नानंतर सेट नाही म्हणून मुल जन्माला घालायं घाबरतो.जर झालीच मुले तर त्यांचा शिक्षणाचा खर्च झेपावा म्हणून जीव मारून जगतो.मोठमोठ्या अपेक्षा आणि स्वप्नासाठी आनंदात आणि सुखात करायचं संसार एवढं अवघड आणि बेचव करून ठेवता की फक्त जगायाच्ट म्हणून जगणं चालू असतं.तुम्ही सेट नाही म्हणून कोठे फिरायला जात नाही.घरात गाडी घेत नाही.एखादा मोठा व्यवहार करत नाही.छोट्या गोष्टींसाठी मोठ्या गोष्टी करायला घाबरता तर कधीकधी मोठ्या गोष्टींसाठी छोट्या गोष्टींना टाळता.

अरे कशाला येवढं ताण घेताय.गरीब माणूस सुद्धा आयुष्य जगतोय आणि श्रीमंत सुद्धा.हुशार सुद्धा जगतोय आणि अडाणी सुद्धा. काळा असो की गोरा. जाड असो की हाडकुळा यातील कोणीही सेट नाही पण आनंदाने जगण्याचं धाडस तरी करत आहेत. मान्य आहे आर्थिक अडचणी सर्वांना असतात पण त्यामुळे तुम्ही आज मावळणाऱ्या सुर्यास्ताचा आनंद घेण्याचं सोडून उद्या उगवणाऱ्या सूर्याकडे आस का लावून बसायचं.सेट होणारा प्रत्येक माणूस सुखी आणि समाधानी असेलच असे नाही पण वेळेसोबत चालून आपल आयुष्य आनंदाने जगणारा प्रत्येक माणूस त्याच्या दृष्टीने सेट झालेलाच असतो.आणि काही अडचण आली तर तुमचे कुटुंब आणि मित्र आहेतच सोबती तुमच्या.त्यामुळे आता सेट झाल्यावर बघू नाही तर आधी बघू मग त्याप्रमाणे सेट होवू अस बोला...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News