चला करुया एमबीएची तयारी..!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 12 July 2019

जुलै महिन्याच्या सुरवातीलाच हा मॅनेजमेंट विषय घेण्याचे महत्त्वाचे कारण आहे. एमबीए प्रवेशपरीक्षेची तयारी करून घेणारे क्‍लासेस आताच सुरू होतात. चार महिने क्‍लास करून मग त्यातील परीक्षांचा सीझन किंवा परीक्षांचा अनुक्रम सुरू होतो. नोव्हेंबरमध्ये ‘कॅट’ नावाची सर्व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या प्रवेशासाठीची प्रवेशपरीक्षा असते. आयआयएम या नावाने या स्वायत्त संस्थांतील अभ्यासक्रमाचे प्रवेश याद्वारे होतात.

नंतर त्याच दर्जाच्या, पण अन्य काही संस्थांच्या स्वतंत्र प्रवेशपरीक्षा होत जातात. सिंबायोसिसची स्नॅप मॅनेजमेंट असोसिएशन मॅट नावाने परीक्षा घेते तर जमशेदपूर, भुवनेश्‍वर येथील एक्‍सएलआरआय व एक्‍सएलआय झॅट (XAT) या नावाने परीक्षा घेतात. मुंबई येथील देवनारची टाटा सोशल सायन्सची संस्था वेगळीच परीक्षा घेते. यानंतर येते ती आपल्या राज्याची सीईटी.

थोडक्‍यात नोव्हेंबर ते मे यादरम्यान हा सारा खेळ खेळला जात असतो. या साऱ्या परीक्षांचे सूत्र एकच असते. पदवीसमकक्ष इंग्रजीचे व्याकरण व आकलन हवे. इयत्ता दहावीसाठीचे गणित उत्तम हवे, व्यावहारिक हवे.

त्याच वेळी तर्कविचार करून योग्य निष्कर्ष काढण्यासाठीचे प्रश्‍न असलेला एक मोठाच भाग या परीक्षेत येतो. अर्थातच सामान्य ज्ञानाची पातळी सर्वांत महत्त्वाची. कारण अनेक ठिकाणी प्रथम लेखी परीक्षा, त्यानंतर गटचर्चा व शेवटी मुलाखत या टप्प्यातूनच प्रवेश होतो. 

प्रत्येक टप्प्यावर सहसा साठ ते सत्तर टक्के विद्यार्थी खड्यासारखे निवडून प्रवेशप्रक्रियेतून बाद होत जातात. ढोबळ आकड्यांतून सांगायचे तर सर्वांत प्रसिद्ध व सर्वांत कठीण अशा ‘कॅट’ परीक्षेला तीन ते साडेतीन लाख विद्यार्थी बसतात. गटचर्चेला त्यातील फारतर दहा-बारा हजारांना बोलावले जाते. 

मुलाखतीतून एबीसीएल (म्हणजे अहमदाबाद, बंगळूर, कोलकता, लखनौ) या चार टॉप संस्थांसाठी त्यातून जेमतेम आठशे ते हजारांची निवड होते. एवढेच कशाला सर्वांत सोप्या राज्याच्या सीईटीला दरवर्षी लाखभर विद्यार्थी बसतात. परीक्षा दोनशे मार्कांची असते. त्यापैकी शंभर मार्क मिळविणारे (म्हणजे पन्नास टक्के मिळविणारे) फारच क्वचित दोन हजार विद्यार्थी निघतात. थोडक्‍यात पदवीचे मार्क विसरून ही प्रवेशपरीक्षा व हा अभ्यासक्रम समजून घेणे महत्त्वाचे.
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News