चला छंदालाच बनवू करिअर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 7 July 2019

सध्या जवळपास सर्वच पालक स्वतःच्या मुलाला औपचारिक शिक्षणाबरोबरच अनेक छंदवर्गांना पाठवत आहेत. असे छंद किंवा विविध कला शिकण्यातून काही साध्य होणार आहे का, असाच प्रश्न बऱ्याच जणांना व सुरवातीला विद्यार्थ्यांनाही पडतो. पण, भारतीय समाजव्यवस्थेत झपाट्याने होणारे बदल पाहता असे फावल्या वेळेत जोपासलेले छंदच अनेकांना सुंदर करिअर मिळवून देत आहेत. 

सध्या जवळपास सर्वच पालक स्वतःच्या मुलाला औपचारिक शिक्षणाबरोबरच अनेक छंदवर्गांना पाठवत आहेत. असे छंद किंवा विविध कला शिकण्यातून काही साध्य होणार आहे का, असाच प्रश्न बऱ्याच जणांना व सुरवातीला विद्यार्थ्यांनाही पडतो. पण, भारतीय समाजव्यवस्थेत झपाट्याने होणारे बदल पाहता असे फावल्या वेळेत जोपासलेले छंदच अनेकांना सुंदर करिअर मिळवून देत आहेत. 

नृत्य, संगीत, नाट्य, वाद्य अशा पारंपरिक छंदांना टीव्ही, वेब मेडिया, चित्रपट, माहितीपट निर्मिती यामुळे सुगीचे दिवस आले आहेत; तर चित्रकला, शिल्पकला, कॅलिग्राफी, थ्रीडी पेंटिंग, स्टोन पेंटिंग, विणकाम, भरतकाम, वारली पेंटिंग, मेंदी, इंटेरियर डिझायनर, ड्रेस डिझायनर, सूत्रसंचालन, गाण्याची आवड अशा अनेक वर्षे अडगळीत पडलेल्या छंदांना लोकाश्रय मिळत असल्याने अनेक जण याही क्षेत्रात स्वतःचे वेगळेपण सिद्ध करीत आहेत. दुर्मिळ वस्तूंचा संग्रह, शिवकालीन वस्तू संग्रह, दुर्मिळ नाणी, दगड, शिलालेख जमा करण्याचा छंद अनेक संग्रहालयासाठी वरदान ठरला आहे. अनेक जण स्वतःच्या नव्या हॉटेलची उभारणी करताना अशा पारंपरिक वस्तूंना मोठी पसंती देतात अथवा त्यातील तज्ज्ञ म्हणून छंद जोपासणाऱ्या माणसांची निवड करीत आहेत. 

व्यंग्यचित्र, फोटोग्राफी, कोरिओग्राफी, पोट्रेट अशी आवड जाणीवपूर्वक जोपासलेल्या आणि त्यात गती असलेल्या तरुणांना करिअरचे एक समृद्ध अवकाश खुणावत आहे. साहित्यनिर्मिती, कथा, कविता, ललित लेखन हे फक्त पूर्वी स्वतःची आवड म्हणून केले जायचे. पण, सध्या जाहिरात, प्रकाशन, वर्तमानपत्र, वेब पोर्टल, विविध विषयांसाठी वाहिलेली मासिके, साप्ताहिके अशा अनेक क्षेत्रांसाठी दर्जेदार लिखाणाची आवश्‍यकता नेहमीच असते. त्यामुळे हे क्षेत्र नावलौकिकाबरोबरच अर्थार्जनही मिळवून देत आहे. खेळाची आवड, व्यायाम, कुस्ती हे पूर्वी फक्त शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळले जायचे. पण, सध्या या क्षेत्रात नव्या ॲकॅडमी, क्‍लब आकाराला येत आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील तज्ज्ञ माणसांची भरपूर गरज निर्माण झाली आहे. जर आपल्याला क्रीडा क्षेत्रात आवड असेल तर नक्कीच यात आपण यशस्वी होऊ शकता. आजकाल शालेय शिकवण्यांपासून, योगवर्ग, संस्कार वर्ग, श्‍लोक व गाण्यांचे क्‍लासेस, विदेशी भाषा वर्ग असे शिकवणी वर्गही आपण सुरू करू शकता.

वेगवेगळ्या प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ बनविणे ही कला केवळ आवड म्हणून अनेकांनी जोपासली. पण, सध्या मात्र असे नवनवीन खाद्यपदार्थ बनविणे, दुसऱ्याला बनवायला शिकविणे, हेच मुख्य अर्थार्जनाचे साधन बनले आहे. या व्यवसायात देशातील हजारो तरुण-तरुणी गुंतले आहेत. आपणही असे काही छंद जोपासत असाल किंवा काही तरी वेगळे करण्याची इच्छा असेल तर नक्कीच तुमची आवड तुम्हाला वेगळी ओळख निर्माण करून देऊ शकते. फक्त औपचारिक शिक्षण संपल्यानंतर त्या-त्या क्षेत्रातील गरजेचे शिक्षण घेणे, त्यातील पदवी अथवा पदविका मिळविणे गरजेचे असते. या क्षेत्रात करिअर करणे सोपे वाटत असले तरी प्रचंड इच्छाशक्ती, नावीन्याची आस, नवनिर्मितीचा ध्यास असलाच पाहिजे. समाजाच्या गरजा ओळखून त्यानुसार स्वतःच्या छंदाला पैलू पाडण्याची क्षमता असेल, पारंपरिक चौकट मोडून वेगळे काही करू इच्छित असाल तर नक्कीच हे करिअर तुमचं स्वागत करीत आहे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News