इथल्या धोकादायक इमारतीत घेतले जातात शिक्षणाचे धडे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 10 July 2019
  • आष्टी तालुक्‍यातील निमगाव चोभा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सध्या जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे

कडा - आष्टी तालुक्‍यातील निमगाव चोभा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सध्या जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे. येथील शाळेत पहिली ते चौथीपर्यंत एकूण ६९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.येथील शाळाखोल्यांचे बांधकाम १९७७ मध्ये झालेले आहे. त्या काळी दगडाच्या भिंतीत बांधकाम केलेले असून, त्या भिंतींवर ठिकठिकाणी तडे गेले आहेत. 

या खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना बसवणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. पावसाळ्यात केव्हाही भिंत कोसळून मुलांना धोका होऊ शकतो. शाळेबाहेरच्या बाजूला पडवीत मुलांना बसवून शिक्षण दिले जाते. ही पडवीही मुलांच्या अंगावर पडू शकते. अनेक वर्षांपासून या शाळेच्या भिंतीला तडे गेलेले आहेत. मुख्याध्यापक व शालेय शिक्षण समितीने वेळोवेळी शासकीय अधिकाऱ्यांकडे ठराव दिले आहेत; मात्र या गंभीर बाबीकडे कोणत्याही अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. 

यापुढे या शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे की नाही, या विचारात पालक आहेत. शाळाखोल्यांची तत्काळ मंजुरी देण्यासाठी जिल्हा परिषदेत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. आठ दिवसांत मंजुरी न मिळाल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा मधुकर गिऱ्हे, सचिन गाडे यांनी दिला आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News