पुण्यातील गजनृत्याकडे तरुणाईची पाठ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 9 May 2019

पुणे - लोककला व लोकनृत्यांची माणदेशची ओळख असलेल्या गजनृत्याकडे नव्या पिढीने पाठ फिरवली आहे. रोजगार-शिक्षणामुळे आलेले सामाजिक बदल अशा अनेक कारणांमुळे आटपाडीसह दुष्काळी माणदेशातील गावागावांतील हा खेळ-कलाप्रकारास उतरंड लागली आहे.

पुणे - लोककला व लोकनृत्यांची माणदेशची ओळख असलेल्या गजनृत्याकडे नव्या पिढीने पाठ फिरवली आहे. रोजगार-शिक्षणामुळे आलेले सामाजिक बदल अशा अनेक कारणांमुळे आटपाडीसह दुष्काळी माणदेशातील गावागावांतील हा खेळ-कलाप्रकारास उतरंड लागली आहे.गजनृत्य ही माणदेशाची ओळख.

स्थानिक बोलीभाषेत गजीनृत्य म्हणूनही हा खेळ परिचित आहे. जाणकारांच्या मते किमान सुमारे दीड-दोनशे वर्षांची ही नृत्यपरंपरा असावी. प्रामुख्याने माणदेशाचा भाग असलेल्या तीन जिल्ह्यांतील खानापूर, आटपाडी, माण, खटाव, सांगोला, माळशिरस, जत, कवठेमहांकाळ या तालुक्‍यांत गजनृत्य (गजीढोल) खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो. नृत्य करणारा गजी, ढोल वाजवणारा ढोल्या, गजाची घाई लावणारा म्होऱ्या अशी यातल्या खेळाडूची ओळख आहे.

या खेळात म्होऱ्याची भूमिका महत्त्वाची असते. पथकातील सुमारे पंचवीस-तीस जण रंगीत रुमाल उडवत तालबद्ध नृत्य करतात. तीन बटनी नेहरू शर्ट, डोक्‍यावर तुरा काढलेला फेटा, दोन्ही हातात रुमाल, कमरेलाही रंगीत रुमाल व विजार किंवा धोतर घातलेल्या पोशाखातील सर्वांना पाहणे आनंददायी असते.
या खेळाला काही ठिकाणी चुळण असंही म्हटले जाते. ढोलवादकाच्या टिपरीनुसार चाल बदलते. यात त्याचे हावभाव, पायांची हालचाल महत्त्वपूर्ण असते. आवाजातील चढउताराप्रमाणे नृत्याला गती येत असते. सनई, सूर, तुतारीने नृत्यात ताल निर्माण होतो. गजनृत्याचे ५५ प्रकार आहेत.

त्यांना ‘घाय’ असं म्हटलं जातं. खेड्यात सणासुदीला व अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी गजनृत्याचे सादरीकरण केले जाते. चपळता, कल्पकता, बुद्धिमत्ता आणि नैसर्गिक रचनाबद्ध असा तो नृत्यप्रकार असल्याने गजीढोल या नृत्याची  रचना वैशिष्ट्यपूर्ण अशीच आहे. एक वैशिष्ट्य म्हणजे वाद्यांच्या तालावरून रांगडे स्वर, खणखणीत आवाज आणि जोशपूर्ण वातावरणात केलं जाणारं जोमदार गजनृत्य टिकावं असं प्रत्येकाला वाटते; मात्र काळाची आव्हाने या खेळप्रकारासमोर उभी आहेत.

गजनृत्य ही माणदेशाची ओळख. स्थानिक बोलीभाषेत गजीनृत्य म्हणूनही हा खेळ परिचित आहे. जाणकारांच्या मते किमान सुमारे दीड-दोनशे वर्षांची ही नृत्यपरंपरा असावी. प्रामुख्याने माणदेशाचा भाग असलेल्या तीन जिल्ह्यांतील खानापूर, आटपाडी, माण, खटाव, सांगोला, माळशिरस, जत, कवठेमहांकाळ या तालुक्‍यांत गजनृत्य (गजीढोल) खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो. नृत्य करणारा गजी, ढोल वाजवणारा ढोल्या, गजाची घाई लावणारा म्होऱ्या अशी यातल्या खेळाडूची ओळख आहे. या खेळात म्होऱ्याची भूमिका महत्त्वाची असते.

पथकातील सुमारे पंचवीस-तीस जण रंगीत रुमाल उडवत तालबद्ध नृत्य करतात. तीन बटनी नेहरू शर्ट, डोक्‍यावर तुरा काढलेला फेटा, दोन्ही हातात रुमाल, कमरेलाही रंगीत रुमाल व विजार किंवा धोतर घातलेल्या पोशाखातील सर्वांना पाहणे आनंददायी असते.या खेळाला काही ठिकाणी चुळण असंही म्हटले जाते. ढोलवादकाच्या टिपरीनुसार चाल बदलते. यात त्याचे हावभाव, पायांची हालचाल महत्त्वपूर्ण असते. आवाजातील चढउताराप्रमाणे नृत्याला गती येत असते. सनई, सूर, तुतारीने नृत्यात ताल निर्माण होतो. गजनृत्याचे ५५ प्रकार आहेत.

त्यांना ‘घाय’ असं म्हटलं जातं. खेड्यात सणासुदीला व अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी गजनृत्याचे सादरीकरण केले जाते. चपळता, कल्पकता, बुद्धिमत्ता आणि नैसर्गिक रचनाबद्ध असा तो नृत्यप्रकार असल्याने गजीढोल या नृत्याची  रचना वैशिष्ट्यपूर्ण अशीच आहे. एक वैशिष्ट्य म्हणजे वाद्यांच्या तालावरून रांगडे स्वर, खणखणीत आवाज आणि जोशपूर्ण वातावरणात केलं जाणारं जोमदार गजनृत्य टिकावं असं प्रत्येकाला वाटते; मात्र काळाची आव्हाने या खेळप्रकारासमोर उभी आहेत.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News