बसमध्ये लेस्बियन मुलींना तरुणांकडून मारहाण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 June 2019

तरूणांना या मुली लेस्बीयन असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी या दोन मुलींची छेडछाड करण्याचा प्रयन्त केला. त्यांना एकमेकांना चुंबन घेण्यास सांगितले, त्यावर त्यांनी नकार दिल्यावर त्यांना अवार्च शब्दांत शिवीगाळी करत.....

लंडनमध्ये दोन मुलींवर चार विकृत मनोवृत्तीच्या तरुणांकडून बसमध्ये मारहाण केल्याची घटना नुकतीच समोर येतेय. समलिंगी संबंध असलेल्या या मुली दोन मजली बसच्या वरच्या मजल्यावर बसून आपली मैत्रीण ख्रिस हिच्यासमवेत जात होत्या. रात्रीच्या वेळेस बसमध्ये इतर कोणीही नसून फक्त  चार १५ ते १८ वयातील तरुण असताना त्या प्रवास करत होत्या.    

तरूणांना या मुली लेस्बीयन असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी या दोन मुलींची छेडछाड करण्याचा प्रयन्त केला. त्यांना एकमेकांना चुंबन घेण्यास सांगितले, त्यावर त्यांनी नकार दिल्यावर त्यांना अवार्च शब्दांत शिवीगाळी करत त्या चारही तरुणांनी मारहाण केली. चेहऱ्यावर गुद्दे मारून निर्घृण हल्ला केला. तेव्हढेच नसून त्यांच्या जवळच्या पर्स घेऊन पळवटा केला. या घटनेची तक्रार केल्यावर पोलिसांनी दखल घेत चार तरुणांना अटकही करण्यात आली.

होमोफोबिक हेट क्राइममध्ये गेल्या चार वर्ष्यांमधे लंडनमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. २०१८ मध्ये पोलिसांकडून २३०८ गुन्हांची नोंद झाली आहे. २०१४ मध्ये हे प्रमाण इतके होते. या मुली शांतपणे बसमध्ये बसल्या असताना हे चार तरुण अश्लील शेरेबाजी करत त्यांच्याकडे गेले असं पोलिसांनी सांगितले.

या दोन मुलींपैकी  मेलेनिया गेमॉट या मुलीने फेसबुक पेजवर त्यांचा ऐक फोटो शेअर केला. त्या फोटोवरून निर्घृण हल्ला केल्याची कल्पना येते. आम्ही समलिंगी जोडपं आहोत असं समजल्यावर ते तरुण आमच्याकडे आले आणि लगेच आम्हाला त्रास देऊ लागले, मारहाण करु लागले असं बिबिसी रेडिओ ४ शी बोलताना सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News