अर्थ संकल्प नवा, बदललेले आधार कार्ड आणि पॅन कार्डचे नियमही नवे, जाणुन घ्या नवे नियम

सुरज पाटील
Tuesday, 9 July 2019

आपल्या देशात काही दिवसांपासून आधार कार्ड आणि पॅन कार्ड सक्तीचे केल्याने नागरिकांना आर्थिक व्यवहार करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. मात्र देशात 2019 चा आर्थिक संकल्प सादर केल्यानंतर पॅन कार्ड आणि आधार कार्ड वापरण्याबद्दल काही नियम बदलले आहेत, ज्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

भाजपा 2.0 सरकारच्या पहिल्या अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी अर्थसंकल्पीय भाषणात असे घोषित केले की जिथे पॅन कार्डच्या नंबरची गरज आहे, त्या ठिकाणी आधार कार्ड नंबरवर काम चालू शकते, म्हणजे पॅन कार्डच्या जागी आधार कार्ड हा एक पर्याय म्हणून उभा आहे. 

सध्या 120 कोटींहून अधिक आधार कार्ड तर 41 कोटींहून अधीक पॅन कार्डचा वापर देशभरात केला जात आहे, तर 22 कोटी पॅन कार्ड हे आधार कार्डशी जोडले जात आहेत. त्यामुळे ज्या लोकांकडे पॅन कार्ड नाही त्या लोकांनी आधार कार्ड नंबरच्या आधारे टॅक्स रिटर्न करू शकता, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी केली आहे.

हे झालेत बदल...

  • पन्नास हजारांच्या वर रुपयांची देवाण-घेवाण करताना किंवा तेवढी रक्कम बॅंकमध्ये जमा करताना पहिला पॅन कार्ड नंबरची गरज होती, मात्र आता आधार कार्ड नंबरचा वापर करून ही कामे जमा करता येणार.
  • म्युच्युअल फंड, गुंतवणूक आणि शेअर खेरदीच्या ठिकाणी पॅन कार्ड नंबरच्या जागे आधारकार्ड नंबर वापरता येणार.
  • 2 लाखांच्यावर सोने खरेदी करताना तसेच चार चाकी गाडी खरेदी करताना पॅन कार्डच्या ऐवजी आधार कार्ड नंबर देऊन तुम्ही खरेदी करू शकता.
  • क्रेडिट कार्डच्या अर्जासाठी पॅन कार्डची गरज नाही, तर आधार कार्ड नंबरवर हे काम होऊ शकते.
  • हॉटेल्सच्या तसेच परदेशी दौऱ्यावर 50 हजार रुपयांच्यावर कॅश पेमेंट करणार असाल, तर पॅन कार्डची अवश्यकता नाही. आधार कार्ड नंबरच्या साहाय्याने तुम्ही कॅश पेमेंट करू शकता.
  • इंश्योरन्स कंपन्यांना प्रीमियम म्हणून एका वर्षाच्या कालावधीत 50 हजार रुपयांचं पेमेंट करणार असाल तर त्या ठिकाणी आधार कार्ड नंबर देऊन पेमेंट करू शकता.
  • 10 लाखांच्यावर मालमत्ता खरेदी करत असाल तर पॅन कार्डचा वापर न करता आधार कार्डच्या मदतीने तुम्ही मालमत्ता खरेदी करू शकता.
  • एकंदरित ज्या आर्थिक गोष्टींची कामे करत असताना पॅन कार्ड गरजेचे होते, त्या ठिकाणी आधार कार्डवर काम होऊ शकते अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News