"बाबा" झाल्यावरही मिळणार २६ आठवड्यांची रजा? 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 June 2019

मुंबई : मातृत्त्वानंतर नोकरी सोडण्याचं वाढतं प्रमाण पाहता आता 'झोमॅटो'नं एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. या कंपनीने आता त्यांच्या धोरणातच बदल केले आहेत आणि त्यानुसार, आता 'झोमॅटो'मध्ये २६ आठवड्यांची पगारी रजा दिली जाणार आहे.

'झोमॅटो' एकूण १३ देशांमध्ये आहे आणि प्रत्येक देशात मातृत्त्वाच्या रजांसंदर्भात असलेल्या नियमांचेही पालन केले जाणार आहे. विशेष म्हणजे, हेच धोरण पुरुष कर्मचाऱ्यांसाठीही लागू केले जाणार आहे. म्हणजेच, 'झोमॅटो'मध्ये २६ आठवड्यांची पितृत्त्व रजा मिळणार आहे.

'झोमॅटो'च्या नव्या धोरणात काय आहे? 

  • सरोगसी किंवा दत्तक मुला/मुलीच्या पालकांनाही या रजा लागू होणार 
  • प्रत्येक बाळामागे एक हजार डॉलरचा बोनस देणार 
  • गेल्या सहा महिन्यांमध्ये कुटुंबात नव्या बाळाचा समावेश झालेल्या कर्मचाऱ्यांनाही ही योजना लागू होणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News