अर्धातास आमदार अडकले लिफ्टमध्ये; आकाशवाणी आमदार निवासातील प्रकार

मुशीरखान कोटकर
Tuesday, 4 June 2019
  • आकाशवाणी आमदार निवास मधील लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड
  • आमदार शशिकांत खेडेकर अर्धा तास लिफ्टमध्ये
  • त्यांच्या समवेत आमदार विनायक मेटे यांचे स्वीय सहाय्य संतोष कचरे व इतर दोन व्यक्ती होते.

मुंबई: येथे आकाशवाणी आमदार निवास मधील लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आमदार शशिकांत खेडेकर अर्धा तास लिफ्टमध्ये अडकून राहिलेल्याची घटना आज (ता.४) सायंकाळी आठ वाजेदरम्यान घडली.                                       

मातृतीर्थ सिंदखेड राजा मतदार संघाचे आमदार डॉ. शशिकांत खेडेकर मुंबई येथे आकाशवाणी आमदार निवास येथील त्यांच्या फ्लॅटवर जात असताना अचानक तांत्रिक बिघाड आल्याने लिफ्ट थांबली. यावेळी त्यांच्या समवेत आमदार विनायक मेटे यांचे स्वीय सहाय्य संतोष कचरे व इतर दोन व्यक्ती होते.

सदर प्रकार लक्षात आल्यानंतर आकाशवाणी आमदार निवासात एकच खळबळ उडाली. सोशल मीडियावर या वृत्तानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. दरम्यान सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आमदार खेडेकर यांना लिफ्टमधून बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला माँ साहेब जिजाऊंच्या आशीर्वादाने सुरक्षितपणे बाहेर आलो अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News