दहावीच्या निकालाची हे दहा वैशिष्ट्ये जाणून घ्या!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019

यंदा पुन्हा एकदा मुलांपेक्षा मुलींनी या परीक्षेत बाजी मारली आहे. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी आहे ७२.१८ टक्के तर मुलींची आहे ८२.८२ टक्के.

१. यंदा पुन्हा एकदा मुलांपेक्षा मुलींनी या परीक्षेत बाजी मारली आहे. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी आहे ७२.१८ टक्के तर मुलींची आहे ८२.८२ टक्के.

२. मंडळाकडून एकूण ७१ विषयांची परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी १९ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

३. नवीन अभ्यासक्रमानुसार यंदा पहिलीच परीक्षा घेण्यात आली होती.

४. मार्च २०१९ मध्ये परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल गेल्या वर्षीच्या म्हणजेच मार्च २०१८ मध्ये परीक्षा दिलेल्यांच्या तुलनेत १२.३१ टक्के कमी आहे. म्हणजेच यावेळी कमी विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

५. नऊ विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ८८.३८ टक्के इतका लागला आहे.

६. सर्वांत कमी निकाल नागपूर विभागाचा ६७.२७ टक्के इतका लागला आहे.

७. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ८३.०५ टक्के इतका लागला आहे.

८. राज्यातील १७९४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

९. परीक्षेत २,९०,०३२ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत तर ४,७३,३७८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

१०. मुला-मुलींवर परीक्षेचा ताण येऊ नये म्हणून यावेळी ५७ समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्याचा विद्यार्थ्यांना फायदा झाला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News