वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे जाणून घ्या...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 15 July 2019
  •  डॉ. अमित बोराडे यांनी 'परदेशातून एमबीबीएस : समज, गैरसमज' या विषयावर  सेमिनार घेतला होता . 
  • या क्षेत्रात जर कोणाला करिअर करायच असेल त्यांना अभ्यासात मेहनत घेणं खूप महत्त्वाच आहे. आणि त्याचबरोबर आपण कोणत्या कॉलेजमध्ये शिकतो तेही तेवढंच महत्त्वाच असत.

प्रत्येक मुलांना वाटत की, आपण डॉक्टर बनाव आपल्या हातून लोकांना मदत व्हावी. त्यासाठी परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून  डॉ. अमित बोराडे यांनी 'परदेशातून एमबीबीएस : समज, गैरसमज' या विषयावर  सेमिनार घेतला होता . 

या क्षेत्रात जर कोणाला करिअर करायच असेल त्यांना अभ्यासात मेहनत घेणं खूप महत्त्वाच आहे. आणि त्याचबरोबर आपण कोणत्या कॉलेजमध्ये शिकतो तेही तेवढंच महत्त्वाच असत. अनेक विद्यार्थ्यांना वाटत असत आपण परदेशात जाऊन तंत्रज्ञानातील वैद्यकीय शिक्षण घेतलं पाहिजे. पण काही कारणास्तव त्यांना माघार घ्यावी लागते, मग ते आर्थिक प्रॉब्लेम असो वा माहितीच्या अभावामुळे.मात्र, योग्य मार्गदर्शन, योग्य कॉलेज असेल तर ते विद्यार्थ्यांना  हिताचे ठरू शकते.

परदेशात वैद्यकीय शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना ‘नीट' परीक्षा उत्तीर्ण  होण गरजेच आहे, याची घोषणा  केंद्र सरकारने केली होती. आपल्या भारत देशातून बहुतेक विध्यार्थी  वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशांत जातात.बारावीमध्ये किमान ५० टक्के गुण  असतील तरच विद्यार्थ्यांसाठी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडून पात्रता प्रमाणपत्र घ्यावे लागते. विध्यार्थी परदेशातून वैद्यकीय पदवी घेऊन आले तरी या विद्यार्थ्यांना त्या पदवीच्याआधारे भारतात लगेच डॉक्टरी व्यवसाय करता येऊ शकत नाही. भारतात जर डॉक्टरी व्यवसाय सुरु करायचे  असेल तर त्यांना मेडिकल कौन्सिलतर्फे घेतली जाणारी परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागते.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News