निवडणूक न लढवता मंत्रीपद कसे मिळवायचे हे माझ्याकडून शिका - आठवले

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019

लोकसभेत आपल्या पक्षाला एकतरी जागा मिळावी म्हणून आठवलेंनी आग्रह धरला होता. जागा मिळाली नाही, पण मंत्रीपद मिळालं. या मुद्द्यावर बोलताना आठवले म्हटले की मंत्रीपद कसं मिळवायचं हे माझ्याकडून शिका! 

 

रामदास आठवले यांच्या रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाने लोकसभा निवडणुकीत एकही जागा लढवली नाही. तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुध्दा मी कधीचं भेटलो नाही. तरीही मला मंत्रीपद मिळाले आहे, त्यामुळे मंत्रीपद कसे मिळवायचे हे माझ्याकडून शिका असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी हे उद्गार काढले. लोकसभेत आपल्या पक्षाला एकतरी जागा मिळावी म्हणून आठवलेंनी आग्रह धरला होता. जागा मिळाली नाही, पण मंत्रीपद मिळालं. या मुद्द्यावर बोलताना आठवले म्हटले की मंत्रीपद कसं मिळवायचं हे माझ्याकडून शिका! 

ठाकरे दहावेळा अयोध्येला गेले तरीही राम मंदिर होणार नाही असं वक्तव्य रामदास आठवलेंनी नुकतंच केलं. त्याबाबत विचारलं असता मंदिर व्हावं हे माझंही मत आहे. मात्र ते कायदेशीर पद्धतीने झालं पाहिजे असंही आठवले यांनी स्पष्ट केलं.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या. याबाबत आठवलेंना विचारले असता ते आठवले म्हटले की शरद पवार यांनी आता काँग्रेससोबत राहू नये. त्यांनी आता एनडीएत आलं पाहिजे. शरद पवार यांची पॉवर काँग्रेसपेक्षा जास्त आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News