कतरीनाचा स्लिम ड्रीम फंडा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 8 July 2019
  • ‘तीस मार खान’ या चित्रपटानंतर मी सर्वांना अचंबित करण्याएवढे वजन कमी केले आणि स्वतःला स्लिम आणि फिट बनवले.
  • मी झिरो फिगर बनवण्यासाठी वर्कआउट आणि डाएट या दोन्ही गोष्टींवर लक्ष केंद्रित केले होते.

‘तीस मार खान’ या चित्रपटानंतर मी सर्वांना अचंबित करण्याएवढे वजन कमी केले आणि स्वतःला स्लिम आणि फिट बनवले. मी झिरो फिगर बनवण्यासाठी वर्कआउट आणि डाएट या दोन्ही गोष्टींवर लक्ष केंद्रित केले होते. वर्कआउटमध्ये मी कार्डिओ, स्विमिंग, सायकलिंग, जिम, जॉगिंग आणि योगा अशा प्रकारचे व्यायाम करते. मी व्यायामात नेहमी विविधता ठेवते. जेणेकरून व्यायाम करायलादेखील मजा येईल. तुम्ही रोज तोच-तो व्यायाम करीत राहिलात तर तुम्हाला ते काही दिवसांनी कंटाळवाणे वाटू लागते.

यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करणे आवश्‍यक आहे. शरीराच्या लवचिकतेसाठी मी योगाला महत्त्व देते. यासोबत डाएट पाळणेही महत्त्वाचे आहे. यासाठी मी रोज सकाळी उठल्यावर ४ ग्लास पाणी पिते. त्यानंतरच्या नाश्‍त्यात कडधान्य, ओटमिल, ज्यूस, अंड्याचा पांढरा भाग घेते. दुपारच्या जेवणात मी उकडलेला भात आणि हिरव्या भाज्यांचे सलाड खाते. रात्रीच्या जेवणात भाज्यांचे सूप, डाळ किंवा उकडलेल्या भाज्या, तेल न लावलेल्या चपात्या आणि हिरव्या भाज्यांचे सलाड खाते. 

फिट राहायचे असल्यास सकाळी उठल्यावर जास्तीत-जास्त पाणी प्या. योग्य पदार्थ, योग्य वेळेतच खा. दिवसाची सुरवात चहा किंवा कॉफीपासून करू नका. तळलेले पदार्थ खाऊ नका. मी रात्रीचे जेवण झोपायला जाण्यापूर्वीच्या दोन तास आधी घेते. तसेच मला सीझनल फळे खायला आवडतात. मी माझ्या फिटनेसबाबत खूप प्रामाणिक राहते. मला एकही दिवस वर्कआउट अथवा डाएट मोडायला आवडत नाही. 

माझी त्वचा चमकण्यातही डाएटचाच महत्वाचा हात आहे. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने त्वचा चमकत राहते. तसेच ताज्या फळांचा रस, भाज्यांचे सूप, ताज्या भाज्या, यामुळे त्वचा नेहमी चमकत राहते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News