जाणून घ्या तरुणाईकडून कागदाचा कसा करावा वापर

प्रफुल्ल भंडारी 
Saturday, 8 June 2019

दौंड ( पुणे) : दौंड शहरातील शेठ ज्योतिप्रसाद विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी वहीबांधणी कार्यशाळेत कागदाचा पुनर्वापर करून विविध आकाराच्या १०२१ वहया तयार केल्या. 

दौंड ( पुणे) : दौंड शहरातील शेठ ज्योतिप्रसाद विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी वहीबांधणी कार्यशाळेत कागदाचा पुनर्वापर करून विविध आकाराच्या १०२१ वहया तयार केल्या. 

विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेचे पथक प्रमुख प्रमोद काकडे यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेच्या पूर्वी गृहपाठ, वर्गपाठ, शास्त्र विभागातील जर्नल, आदी वह्यांमधील कोरी पाने जमा करण्याचे आवाहन केले होते व त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. प्रकल्पांतर्गत उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यालयात वहीबांधणी संबंधी कार्यशाळा घेण्यात आली होती व त्यामध्ये विद्यार्थ्यांनी संकलित केलेली पाने जुळविणे, वह्या स्टेपल करणे, पुठ्ठे चिकटवून बाईंडिंग कापड लावणे, आदी क्रिया करून घेण्यात आल्या. राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी आदित्य लोंढे, आदित्य सांगळे, आदींनी या वह्या तयार केल्या. वह्यांच्या मुखपृष्ठावर राष्ट्रीय हरित सेनेचे बोधचिन्ह व पर्यावरण विषयक संदेश छापण्यात आले आहेत. वह्यांबरोबर छोट्या डायरी, नोटपॅड व कागदी पाकिटे तयार करण्यात आली आहेत.
    
तेरा वर्षांपासून हा उपक्रम विद्यालयात राबविला जात असून तयार दरवर्षीप्रमाणे यंदाही गरजू विद्यार्थ्यांना या वह्या वितरित केल्या जाणार आहेत, अशी माहिती प्रमोद काकडे यांनी दिली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News