शिक्षणाधिकारी कार्यालयाचे गळतीचे विघ्न संपता संपेना!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 30 July 2019

बेळगाव: जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. त्यामुळे कार्यालयात ठिकठिकाणी बकेट ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे. पाण्याची गळती होत असलेल्या ठिकाणीच बसून कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहेत. गळतीबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याला ४५ हून अधिकवेळा पत्रे लिहिण्यात आली आहेत. तरीही इमारतीच्या डागडुजीकडे लक्ष देण्यात आलेले नाही.

पावसाला सुरुवात झाल्यापासून जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या सर्व शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. तसेच एका भिंतीवर पूर्णपणे पाणी येत असून सर्वत्र पाणी पसरत आहे. ठिकठिकाणी पाणी गळती होत असल्याने बकेट ठेवण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे. गेल्या वर्षी शिक्षण खात्याच्या कार्यालयावर फांदी कोसळून नुकसान झाले होते. त्यानंतर केवळ फांदी पडलेल्या भागात डागडुजी करण्यात आली. मात्र, इतर भागात तुटलेल्या कौलांकडे लक्ष देण्यात आलेले नाही. त्यामुळे अधिक प्रमाणात पाणी गळती होत आहे.

शिक्षण खात्याची इमारत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत आहे. त्यामुळे इमारतीच्या डागडुजीसाठी शिक्षण खात्यातर्फे अनेकदा पत्र लिहिण्यात आले आहे. परंतु, त्याकडे बांधकाम विभागाने कधीही गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. त्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे. तसेच कागदपत्रे भिजण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे. शिक्षण खात्याच्या कार्यालयात दररोज मोठ्या प्रमाणात शिक्षक व इतर नागरिक येतात. तरीही इमारतीच्या डागडुजीकडे लक्ष देण्यात येत नसल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्‍त करण्यात येत आहे. 
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News