‘कायदा-पत्रकारिता’ म्हणून संधी  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 16 November 2019

सर्वोच्च न्यायालयात पत्रकारिता करायची असेल तर अशा पत्रकारांनी लॉचे शिक्षण घेतले असावे अशी अटच आहे व हळूहळू हा नियम सगळ्या न्यायालयांना लागू करण्यात येणार आहे.

कायद्याच्या क्षेत्रात काम करण्याच्या या प्रचलित पर्यायानंतर काही खूप माहिती नसलेले पर्याय व संधीसुद्धा नव वकिलांना उपलब्ध आहेत. ‘कायदा-पत्रकारिता’ हा त्यातील एक पर्याय. कायदा आणि पत्रकारिता यांच्या एकत्रित ज्ञानाचा उपयोग करून एक परिणामकारक व प्रभावी पत्रकार म्हणून काम करणाऱ्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत.

आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांचे, सामाजिक-राजकीय व कायदेविषयक संदर्भांचे नीट आकलन व न्यायालयांचे विविध निर्णय वाचून नेमके अन्वयार्थ काढण्याची क्षमता असणाऱ्यांनी ही संधी नक्की आजमावून बघावी अशी आकर्षक आहे.

आता तर सर्वोच्च न्यायालयात पत्रकारिता करायची असेल तर अशा पत्रकारांनी लॉचे शिक्षण घेतले असावे अशी अटच आहे व हळूहळू हा नियम सगळ्या न्यायालयांना लागू करण्यात येणार आहे. काही वर्षांचा कायदेविषयक-पत्रकारितेचा अनुभव विविध आंतरराष्ट्रीय फेलोशिप, मोठ्या राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय सामाजिक संघटनेमध्ये अधिक पगाराची नोकरी मिळविण्यासाठी उपयोगाची बाब ठरते.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News