महिनाभरापासून ‘लॉ’ प्रवेशाचे पोर्टल बंद; सीईटी देवूनही विद्यार्थ्यांची प्रवेश मिळेणा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 21 July 2019

अकोला: तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाकरीता प्रवेशाठीचे लाॅ सीईटीचे पोर्टल महिन्याभरापासुन बंद पडलेल्या स्थितीत असल्यामुळे विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रीया रखडली आहे. तीन वर्षीय विधी प्रवेशाचा सीईटीचा निकाल जाहीर होवून दोन महिन्यांचा अवधी उलटून गेला आहे. विद्यार्थांना www.mahacet.org या वेबसाईटवर आपले रजिस्ट्रेशन करून महाविद्यालय निवडीसाठी या पोर्टलवर नोंदणी करून अर्ज करवे लागतात. 

परंतु, हे पोर्टल महिन्याभरापासून बंद असल्यामुळे अनेक विद्यार्थांना प्रवेशापासून वंचित राहावे लागत असल्याचे लाॅ कौन्सिलचे अध्यक्ष अंकुश गावंडे यांनी सांगितले. याबद्दल अंकुश गावंडे यांनी विद्यापीठातील विधी विभागात याबाबत विचारणा केली असता, विद्यापीठाला या बाबद काही कल्पना नसल्याचे विद्यापीठाने सांगितले. दरम्यान २३ जुलैपासून ही प्रक्रीया सुरळीत होणार असल्याची माहिती आहे. मात्र, विधी शाखेला प्रवेश घेण्यास उशीर होत असल्याने आगामी महाविद्यालयीन निवडणूकांवर याचा परिणाम होणून विद्यार्थी या निवडणूकीपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

२३ जुलैपासून सुरू होणार पोर्टल 
सीईटी सेलचे आयुक्त आनंद रायते यांच्यासोबत लाॅ कौन्सिलचे अध्यक्ष अंकुश गावंडे यांनी चर्चा करून विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नयेत, यासाठी चर्चा केली असता. विधी प्रवेशाचे कॅप राउंडचे प्रोर्टल २३ जुलैपासून सुरू होनार असल्याची माहिती सीईटी सेलचे आयुक्त आनंद रायते यांनी दिली. विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.   

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News