अभिनेते सयाजी शिंदेंंच्या हस्ते ‘अंकुर शेतकरी आधार’ योजनेचा प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 5 August 2019
  • आत्महत्याग्रस्त शेतकरी व शहीद जवान कुटुंबासह कर्जबाजारी शेतकरी व विधावांना मिळणार लाभ
     

लातूर : महाराष्ट्रासह देशभरात अगदी थोड्याशा कालावधीत नावाजलेल्या चंदनासाठी प्रसिध्द ठरलेल्या अंकुर हायटेक नर्सरीला प्रसिध्द सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी काल रविवार दि. ०४ ऑगस्ट २०१९ रोजी सदिच्छा भेट दिली. यावेळी अभिनेते शिंदे त्यांच्या हस्ते अंकुर शेतकरी आधार योजनेचा शुभारंभ केला. अंकुर आधार योजने अंतर्गत आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाला, शहिद जवानाच्या कुटुंबास, कर्जबाजारी शेतकर्‍यास आणि विधवा महिला शेतकर्‍याला सहकार्य केले जाईल.

अंकुर शेतकरी आधार योजनेअंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास तसेच शाहिद जवानांचे कुटुंब, कर्जबाजारी शेतकरी, विधवा महिला शेतकरी यांच्या शेतात एक एकर क्षेत्रावर मोफत चंदन लागवड व किंवा शेतकर्‍यांच्या आवडीनुसार इतर फळझाडांची मोफत लागवड करुन जोपासनेसाठी लागणार्‍या तंत्रज्ञानाचे निःशुल्क मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती चंदनतज्ञ धनंजय राऊत यांनी यावेळी दिली. योजनेच्या पहिल्या टप्प्यात लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यातील वरील प्रमाणे लाभधारक शेतकर्‍यांच्या शेतात मोफ़त चंदन लागवड करून दिली जाणार आहे.

सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते अंकुर आधार योजनेचा शुभारंभ झाला. याप्रसंगी औसा तालुक्यातील फत्तेपुर येथील आत्महत्या केलेले शेतकरी गोविंद चांदूरे यांच्या एक एकर शेतात चंदन रोपांची मोफत लागवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंकुर शेतकरी आधार योजनेचे मुख्य प्रवर्तक चंदनतज्ञ धनंजय राऊत होते. 

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ‘चला हवा येऊ द्या’ फेम लेखक अरविंद जगताप, नाम फाउंडेशनचे समन्वयक विलास चामे, ह्यूमन राईट्स फाऊंडेशनचे प्रशासकीय संचालक जलतज्ज्ञ रामेश्वर धुमाळ, ज्येष्ठ पत्रकार पंकज जैस्वाल, करजगावचे तलाठी रत्नाकर बबणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.  

तसेच फत्तेपूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या पत्नी श्रीमती राणीताई गोविंद चांदूरे, श्रीहरी चांदूरे, अनिकेत चांदूरे, सामाजिक कार्यकर्ते सुनिल फुलारी, सचिन सुर्यवंशी, कु.मेघा सुर्यवंशी, कर्नाटकातील बिजापूर व मकणापूर येथील शेतकरी पांडुरंग राठोड, नरसिंग राठोड, धोंडिराम जाधव, पापा राठोड, पाखरसांगवी येथील नागनाथराव राऊत, वैजनाथ वाघमारे, लक्ष्मण कांबळे आदींची उपस्थिती होती.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News