दयाबेन घेणार अखेरचा निरोप...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 4 July 2019
  • तसेच त्यांच्या 'कमबॅक'साठी चाहते आग्रही आहेत.
  • मात्र, आता दिशा वाकानी परतणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या हिंदी विनोदी मालिकेतील अभिनेत्री दिशा वाकानी अर्थात दयाबेन गडा यांच्या जागी आता नवीन दयाबेन येणार आहे. विभूती शर्मा असे त्यांचे नाव.दिशा वाकानी गेल्या काही महिन्यांपासून मालिकेत दिसत नाहीये. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांकडून मोठी निराशा व्यक्त केली जात आहे. तसेच त्यांच्या

कमबॅक'साठी चाहते आग्रही आहेत. मात्र, आता दिशा वाकानी परतणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या जागी विभूती शर्मा यांची निवड करण्यात आली आहे.दयाबेनचे जाणार हे निश्चित झाल्यानंतर 'तारक मेहता'च्या निर्माते, दिग्दर्शकांकडून गेल्या काही दिवसांपासून ऑडिशन घेण्यात येत होते. त्यानंतर आता विभूती शर्माला फायनल करण्यात आले आहे.

निवड निश्चित झाली असली तरीदेखील विभूतीने यासाठी साईन केलेले नाही. मात्र, आता लवकरच नवीन दयाबेन प्रेक्षकांच्या भेटीस येणार हे निश्चित झाले आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News