जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदलीचे शेवटचे दोन दिवस

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019

जिल्हा परिषदेच्या शाळांना आठवीचा वर्ग जाेडण्याच्या मुद्यावर जिल्हा परिषद शिक्षक संघटना आणि खासगी शैक्षणिक संस्था संचालक आमने-सामने उभे ठाकले आहे.

अकोला - जिल्हा परिषदेच्या शाळांना आठवीचा वर्ग जाेडण्याच्या मुद्यावर जिल्हा परिषद शिक्षक संघटना आणि खासगी शैक्षणिक संस्था संचालक आमने-सामने उभे ठाकले आहे. त्यांच्यातील वादावर निर्णय घेण्यासाठी दोन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक साेमवार, १० जून राेजी दुपारी ४ वाजता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात हाेणार आहे.

बालकांचा माेफत व सक्तीचा शिक्षण अधिकार अधिनियमानुसार (आरटीई) पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी, अशी प्राथमिक व उच्च प्राथमिक संरचना अस्तित्वात आली आहे. परिणामी जिल्हा परिषदेच्या संरचनेतही बदल करणे क्रमप्राप्त झाले. पहिली ते चाैथीच्या शाळांना पाचवी आणि इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळांना आठवा वर्ग जोडण्याचे काम शासन आदेशानुसार २०१३ मध्ये सुरू झाले. मात्र, त्यामुळे खासगी शिक्षण संस्था अडचणीत आल्या आहेत. त्यांना जिल्हा परिषदे शाळेतून मिळणारी पटसंख्या कमी झाली.

परिणामी त्यांनी याबाबतच्या तक्रारी सुरू केल्यात. त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षक संघटनांनीही वर्ग सुरू करण्याच्या समर्थनात समिती गठीत गेली. या दोन्ही संघटनांची बाजू एेकून घेण्यासाठी साेमवारी संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांना आठवा वर्ग जाेडण्याच्या मुद्यावर मंगळवारी बदली प्रक्रियेबाबत झालेल्या शिक्षक व प्रशासनाच्या संयुक्त बैठकीतही चर्चा झाली हाेती.

महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे प्रदेश प्रवक्ते जव्वाद हुसेन यांनी वर्ग सुरू राहणे आवश्यक असल्याची बाब मांडली हाेती. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी संयुक्त बैठक आयाेजित करून तोडगा काढण्याचे निर्देश दिले होते.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News