तीन वर्षात 2100 जवानांनी सोडली नोकरी तर तिन्ही दलात 78 हजार पदे रिक्त

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 2 July 2019

देशात सगळ्यात महत्वाचं स्थान दिलं जात ते म्हणजे सैन्य दलाला, मात्र या सैन्य दलातील गेल्या तीन वर्षात नोकरी सोडून जाण्याऱ्या जवानांची आकडेवारी 2 हजार 100 च्या घरात आहे. या सगळ्यामुळे आता तिन्ही सैन्य दलाला अधिकारी व जवानांची कमतरता भासू लागली.

देशात सगळ्यात महत्वाचं स्थान दिलं जात ते म्हणजे सैन्य दलाला, मात्र या सैन्य दलातील गेल्या तीन वर्षात सैन्याची नोकरी सोडून जाण्याऱ्या जवानांची आकडेवारी 2 हजार 100 च्या घरात आहे. या सगळ्यामुळे आता तिन्ही सैन्य दलाला अधिकाऱ्यांची तसेच जवानांची कमतरता भासू लागली.

तीन वर्षात सैन्याची नोकरी सोडलेल्या जवानांची संख्यां - 2 हजार 100
तिन्ही दलात रिक्त असलेल्या जागा - 68 हजार 864
तिन्ही जलात अधिकारी पदाच्या रिक्त असलेल्या जागा - 9 हजार 427

राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सभागृहाला दिलेल्या माहितीवरून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे. तरुणांनी सैन्यात भरती व्हावी यासाठी राज्यसरकार प्रयत्नशील आहे, मीडियाच्या माध्यमातून, जागृती अभियान तसेच इतर प्रदर्शनाच्या माध्यमातून सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रचार केला जात आहे.

तिन्ही सैन्य दलात एकूण - 78 हजार 291 पदे रिक्त

  • लष्करात अधिकाऱ्यांच्या एकूण 50 हजार 312 पदांपैकी 42 हजार 913 पदांवर अधिकारी कार्यरत - 7399 पदे रिक्त
     
  • नौदलात एकूण 11 हजार 557 पदे, त्यापैकी 10 हजार 12 पदांवर अधिकारी कार्यरत-  1 हजार 45 पदे रिक्त
     
  • हवाई दलात एकूण 12 हजार 365 पदे आहेत, त्यात - अधिकारी पदाची 483 पदे रिक्त
     
  • म्हणजेच अशाप्रकारे एकूण 9 हजार 427 पदांच्या जागा रिक्त असल्याचं आपल्याला कळतंय

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News