पदार्पणातच ‘लास्ट डील’

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 19 August 2019
  • ‘लास्ट डील’ असे या चित्रपटाचे नाव
  • हा एक क्राईम थ्रिलर चित्रपट
  • चित्रपट जानेवारी २०२० मध्ये चित्रपटगृहात दाखल

पुनीत इस्सारने आपल्या अभिनयकौशल्याने प्रेक्षकांवर छाप पाडल्यानंतर त्याचा मुलगा सिद्धांत इस्सर एका हिंदी चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘लास्ट डील’ असे या चित्रपटाचे नाव आहे.

वडिलांच्या पायावर पाय ठेवत सिद्धांतही आता बॉलीवूडमध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गणेश आचार्य करणार आहेत. सिद्धांतबरोबर या चित्रपटात अभिनेत्री प्रीती चौधरी, सुपर्णा मालाकर आणि अभिनेता अमित पचौरी दिसणार आहेत.

हा एक क्राईम थ्रिलर चित्रपट आहे. लवकरच चित्रीकरण सुरू होणार असून, चित्रपट जानेवारी २०२० मध्ये चित्रपटगृहात दाखल होईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News