भाषा जीवनाची

शशी त्रिभुवन
Tuesday, 11 June 2019

रुसवा नसू दे ओठी 
ओठी असावी गोडी, 
गोकुळ व्हावे घरटे 
घरटे जीवास जोडी!

भाषा असू दे ओली 
ओली उरात माझ्या, 
माझ्या गीतात बोली 
बोली सुरात माझ्या! 

झाडे असू दे हिरवी 
हिरवी शीतल छाया, 
शीणला जरी का जीव 
जीव हा शांत व्हाया! 

नाती असू दे घट्ट 
घट्ट दुधाची साय, 
मावशी आत्या आजी 
आजी सांभाळो माय! 

रुसवा नसू दे ओठी 
ओठी असावी गोडी, 
गोकुळ व्हावे घरटे 
घरटे जीवास जोडी!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News