भूमीने स्वीकारलं फिटनेस चॅलेंज 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 19 July 2019

‘दम लगा के हैश्‍या’ चित्रपटामधून भूमी पेडणेकरने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. तिचा हा पहिलाच चित्रपट. या चित्रपटामध्ये तिने साकारलेली भूमिका गाजली असली तरी वाढत्या वजनामुळे ती त्रस्त होती. म्हणूनच भूमीने स्वतःच फिटनेस चॅलेंज स्वीकारलं.

‘चित्रपटांमध्ये काम मिळावं म्हणून मी वजन कमी केलं नाही. मुळातच वजन वाढल्यामुळे मला शारीरिक त्रास खूप होऊ लागले. स्वतःसाठी मी वजन कमी केले,’ असे भूमीचे स्पष्ट मत आहे. भूमी म्हणते, ‘चित्रपटसृष्टीमध्ये आल्यानंतर मी ३३ किलो वजन कमी केले.

‘दम लगा के हैश्‍या’ करत असताना मी १० किलो वजन कमी केले होते. मात्र, तरीही माझं वजन जास्त होतं. पण वजन कमी करण्यासाठी मी खाणं सोडलं नाही. मी वर्कआऊट ६० टक्के केलं, तर डाएट फक्त ४० टक्के.’

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News