लालूप्रसाद यादव यांना प्राप्तिकर विभागाचा दणका, बेहिशेबी संपत्ती जप्त करणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 June 2019
  • त्यांची ३.७ कोटींची बेहिशेबी संपत्ती

पाटण : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांना प्राप्तिकर विभागाने दणका दिला आहे. त्यांची ३.७ कोटींची बेहिशेबी संपत्ती जप्त करण्यात येणार अाहे. 

पाटण्याच्या जयप्रकाश नारायण विमानतळाजवळ लालूप्रसाद यादव यांच्या मालकीच्या काही इमारती आहेत. या इमारतींची मालकी बेकायदा असल्याचे प्राप्तिकर विभागाच्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या इमारती जप्त करण्यात येणार आहेत. तसेच बिहार आवामी को-ऑपरेटिव्ह बॅंकेमधील लालूप्रसाद यादव यांच्या कोट्यवधींच्या ठेवीही जप्त करण्यात येणार असल्याचे समजते.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News