"लालूं" अनुपस्थित मात्र त्यांचा वाढदिवस साजरा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019

पाटणा/रांची : राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालूप्रसाद यादव यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी पक्षाच्या मुख्यालयात मोठा केक कापून आज साजरा केला. मात्र, लालूंची अनुपस्थिती आणि त्यांची बिघडलेली तब्येत आदींचे आजच्या कार्यक्रमावर सावट होते.

लालू हे सध्या चारा गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांच्यावर रांचीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे लालूंच्या अनुपस्थितीत पक्षाच्या मुख्यालयात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी त्यांना चांगले आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थनाही करण्यात आली. 

लालूंचा वाढदिवस प्रचंड दरवर्षी राजदचे कार्यकर्ते साजरा करत असतात. या वर्षीही कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News