ललितची नवी भुमिका

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019

अभिनेता ललित प्रभाकर या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. यामध्ये तो एका ग्राफिक डिजायनरची भूमिका साकारत आहे.

अभिनेता ललित प्रभाकरला प्रसिद्धी मिळाली ते ‘जुळून येतील रेशीमगाठी’ या मालिकेमुळे. त्याने ‘चि. व चि.सौ.कां.’, ‘तुझं तू माझं मी’, ‘हंपी’ सारखे चित्रपट केले. नुकताच त्याचा ‘आनंदी गोपाळ’ चित्रपट फार गाजला होता.

आता तो ‘स्माईल प्लीज’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. यामध्ये तो एका ग्राफिक डिजायनरची भूमिका साकारत आहे. चित्रीकरणादरम्यान तो एका सीननंतर मनसोक्त डान्स करताना दिसून आला.

या वेळी सेटवरील सर्वांनी त्याच्यासोबत डान्स केला. या चित्रपटात ललितसोबत अभिनेत्री मुक्ता बर्वे, अदिती गोवित्रीकर, प्रसाद ओक यांनी काम केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News