वंचितमध्ये आरएसएस आणि भाजपच्या लोकांची घुसखोरी; अखेर वंचित आघाडीत उभी फूट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 4 July 2019

'वंचित आघाडीमुळे भाजपचाच फायदा होत आहे. वंचितमध्ये आरएसएस आणि भाजपच्या लोकांनी घुसखोरी केली आहे,' असं म्हणत वंचितचे नेते लक्ष्मण माने यांनी प्रकाश आंबेडकरांवर गंभीर आरोप केले आहेत. तसंच प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या अध्यक्षपदाच्या राजीनामा द्यावा

मुंबई, : 'विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला आम्ही ४० जागा सोडत आहोत. वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या २४८ जागांवर निवडणूक लढवेल. त्यांना मंजूर असेल तर त्यांनी येत्या १०  दिवसांत उत्तर द्यावे,' अशी भूमिका वंचितने गुरुवारी पत्रकार परिषदेत घेतली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशीच वंचित बहुजन आघाडीत उभी फूट पडली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना वंचितचे नेते लक्ष्मण माने यांनी प्रकाश आंबेडकरांवर गंभीर आरोप केले आहेत.

'वंचित आघाडीमुळे भाजपचाच फायदा होत आहे. वंचितमध्ये आरएसएस आणि भाजपच्या लोकांनी घुसखोरी केली आहे,' असं म्हणत वंचितचे नेते लक्ष्मण माने यांनी प्रकाश आंबेडकरांवर गंभीर आरोप केले आहेत. तसंच प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या अध्यक्षपदाच्या राजीनामा द्यावा, अशी मागणी लक्ष्मण माने यांनी केली आहे.

'लोकसभा निवडणुकीत आमच्यामुळे भाजपला 10 जागा मिळाल्या आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेमुळे प्रतिगामी शक्तींचाच फायदा होत आहे. आता विधानसभा निवडणुकीतही आंबेडकर तीच भूमिका घेऊन पुढे चालले आहेत. हा पक्ष आता वंचितांचा राहिला नसून त्यामध्ये आरएसएसच्या लोकांनीच घुसखोरी केली आहे,' असं म्हणत लक्ष्मण मानेंनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

'हा पक्ष उभा करण्यासाठी आम्हीही परिश्रम घेतले आहेत. आंबेडकरांनी वंचित आघाडीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा. आम्ही हा पक्ष नव्याने उभा करू. आमची वेगळी वाटचाल करू. प्रकाश आंबेडकरांनी आमचा वापर केला. त्यांच्याद्वारे अजूनही भारिपचं काम सुरू आहे,' असा आरोप लक्ष्मण मानेंनी केला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News